Tarun Bharat

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

Advertisements

पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. पाऊस आपल्यासोबत फक्त आजारच नाही तर त्वचेचे इन्फेक्शनही घेऊन येतो. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो , त्यामुळे चेहरा पुन्हा पुन्हा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. तर जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेच्या काळजी घेण्याच्या काही टिप्स , ज्याचा उपयोग तुम्हाला त्वचेचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी नक्कीच होईल.

१. पावसाळ्याच्या दिवसात, त्वचेची छिद्रे बंद होऊ नयेत यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा सौम्य क्लिंजर वापरून चेहरा धुवावा. याशिवाय ओटमील स्क्रब आणि पपईचा लगदाही वापरू शकता.

२. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर एक लहान चमचा पाण्यामध्ये लॅव्हेंडर तेलाचे दहा थेंब टाकून चेहऱ्याला लावा.

३. पावसाळ्यात दररोज रात्री अँटी-बॅक्टेरियल टोनर लावून झोपा. ज्यामुळे तुमच्या त्वचेची पीएच पातळी नियंत्रित राहील.

४. पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका खूप वाढतो. हे टाळण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

५. शरीराला विषारी पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हाला मुरुमांचा त्रास होणार नाही.

६. तुम्ही जर मेकअप लावत असाल , तर तो काढतेवेळी नीट काढा. यासाठी तुम्ही बदाम तेल तसंच खोबरेल तेलाचा वापर करू शकता.

७. पावसाळ्यात त्वचेला एक्सफोलिएट करणं गरजेचं असत. यासाठी मध आणि साखरेचा स्क्रब वापरू शकता. साखर मृत त्वचेला काढून टाकून छिद्र बंद करण्यास मदत करते, तर मध त्वचेला मॉइश्चरायझ ठेवते आणि मऊ करते.

८. ग्रीन टी, लिंबू आणि काकडी यांसारखे नैसर्गिक टोनर वापरा. टोनिंग केल्यामुळे त्वचेतील घाणही निघून जाईल आणि त्वचा कोरडीही होणार नाही.

९. पावसात चेहऱ्याशिवाय पाय आणि हातांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजण्याचा प्रयत्न करू नका.

१०. रोज किमान ८ ग्लास पाणी प्या तसंच सनस्क्रीन लावायला विसरू नका. पावसाळ्यात सूर्याची किरणे जरी अधिक नसली याचा अर्थ धोकादायक किरणांचा त्वचेवर वाईट परिणाम होत नाही असे नाही.

Related Stories

साताऱ्यात तिहेरी हत्याकांडाने खळबळ; संशियित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Khandekar

देशात मागील 24 तासात 20,346 नवे कोरोनाबाधित; 222 मृत्यू

Rohan_P

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

tarunbharat

लोकसभेसाठी काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते – प्रशांत किशोर

Sumit Tambekar

कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली – गुलाम नबी आझाद

Sumit Tambekar

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांचा विमा काढणार

tarunbharat
error: Content is protected !!