सत्तरी बीडीओ सूर्याजीराव राणे यांचे प्रशासकांना आवाहन : सत्तरीतील सर्व पंचायतीवरील प्रशासकांनी ताबा स्वीकारला
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायतींचे पंचायत मंडळ बरखास्त करण्यात आले. त्या जागी सरकारने नवीन प्रशासकांची नियुक्ती केलेली आहे. या प्रशासकांची एक महत्वाची बैठक सत्तरी तालुक्मयाचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकाऱयांनी सर्व प्रशासकांना जनतेची कामे अडणार नाहीत याची विशेष दखल घ्या व जनतेला चांगल्या प्रकारचे सहकार्य करा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी प्रशासकांच्या बैठकीत बोलताना केले आहे.
याबाबतची माहिती अशी की पंचायतीची मुदत संपुष्टात आल्यानंतर सरकारने सर्व पंचायत मंडळे बरखास्त करून त्याजागी सरकारी अधिकाऱयांची नियुक्ती केलेली आहे. सत्तरी तालुक्मयातील सर्व बाराही पंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती केलेली आहे .यामध्ये केरी ,मोर्ले, पथ्य?, होंडा, पिसुर्ले, भिरोंड, माऊस ,ठाणे, नगरगाव, सावर्डे ,खोतोडा, गुळेली या प्रशासकांनी सोमवारपासून आपल्या पदाचा ताबा स्वीकारला.
सर्व प्रशासकांची आज महत्त्वाची बैठक सत्तरी तालुक्मयाच्या गटविकास अधिकाऱयांनी आपल्या कार्यालयात बोलाविली होती. या बैठकीला सर्व प्रशासक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकाऱयांनी सांगितले की पंचायत हा ग्रामीण स्तरातील विकासाचा महत्त्वाचा पाया आहे. यामध्ये सर्वसामान्य घटक आपल्या कामांसाठी कार्यालयांमध्ये येत असतात. यामुळे त्यांची कामे कोणत्याही स्तरावर अडणार नाहीत याची विशेष दखल घेण्यात यावी.याबाबत निष्काळजीपणा होणार नाही याचे भान सर्व प्रशासकांनी ठेवावे. त्याचप्रमाणे कार्यक्रमानुसार प्रत्येक पंचायतीमध्ये उपस्थित राहून जनतेला चांगल्या प्रकारचे प्रशासन उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सरकारने जनतेची कामे करण्यासाठी प्रशासनाल चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचे सोने करा व जोपर्यंत प्रशासक म्हणून काम करणार आहात तोपर्यंत जनतेला चांगल्या प्रकारचे सहकार्य करा असे आवाहन यावेळी यावेळी सूर्याजीराव? राणे यांनी केले आहे.
सत्तरीतील पंचायती व प्रशासक
- गणेश गावकर पिसुर्ले
- योगेश सावंत नगरगाव
- गुरुदास गोखले माउस
- जयराम हरवळकर खोतोडा
- अझीझ शहा ठाणे
- संतोष लाड भिरोंडा
- राजेश आर्लेकर गुळेली
- राजेश दळवी होंडा
- झिलबाराव देसाई मोर्ले
- लक्ष्मण नाईक पर्ये
- चंदन नाईक केरी
- पवन वरक सावर्डे