Tarun Bharat

खबरदारी घेऊन यात्रा शांततेत पार पाडा

Advertisements

कडोली येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांचे आवाहन

वार्ताहर /कडोली

येथील दसरा उत्सवातील मिरवणुकीत साऊंड सिस्टिमच्या आवाजाची मर्यादा 80 डेसिबलपर्यंत राहील याची सर्वांनी खबरदारी घेऊन यात्रा शांततेत पार पाडावी. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱयांद्वारे यात्रेवर निरीक्षण ठेवले जाणार असल्याचे बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सांगितले.

कडोली येथील दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. कार्यालयात बुधवारी सकाळी शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपायुक्त रवींद्र गडादी बोलत होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यासाठी पोलीस खातेही सहकार्य करील. यात्रा काळात कोणतेही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू, असा इशारा देऊन यात्रेचा हा आनंदोत्सव शांततेत पार पाडा, असे आवाहन केले.

काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांनी, डॉल्बिचा उच्चार न करता साऊंड सिस्टिम म्हणून याकडे पाहून सर्वांनीच याचा आवाज मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणीही मर्यादेचे उल्लंघन करू नये. पोलीस यावर बारकाईने लक्ष ठेवतील. 80 डेसिबलपर्यंत साऊंड सिस्टिमसाठी परवानगी घ्यावी व यात्रा शांततेत पार पडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी धनंजय कटांबळे, पीडीओ वासुदेव ऐक्रत, कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा सुतार (ग्रा. पं. अध्यक्षा), पीएसआय मंजुनाथ, मलगौडा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सुनील पावनोजी यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता सुतार यांनी आभार मानले.

Related Stories

यंदेखूटला कचऱयाचे ग्रहण, प्रशासनाचे दुर्लक्ष

Patil_p

हस्ताने शहर-उपनगरांना झोडपले

Patil_p

बेळगाव तायक्वांदो संघाचे घवघवीत यश

Amit Kulkarni

पारंपरिक शेतीला मधमाशी पालनाची जोड

Omkar B

बेळगाव जिल्हय़ाने द्विशतक गाठले

Patil_p

सैन्य भरतीसाठी ग़जिल्हा प्रशासन सज्ज 4-15 फेब्रुवारीपर्यंत चालणार भरतीची प्रक्रिया

Omkar B
error: Content is protected !!