Tarun Bharat

अश्लील डान्स करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

शिवसेनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन : अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

प्रतिनिधी/कोल्हापूर
Advertisements

धार्मिक कार्यक्रमाच्या अश्लील धिंगाणा करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन मंगळवारी शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आले. पोलिसांनी संबंधीतांवर तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन संबंधीतांचा बंदोबस्त करु असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

सोमवारी दुपारी धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली शहरातील शुक्रवार पेठेमध्ये जोर जोरात साउंड सिस्टीम लावण्यात आल्या होता. या साउंड सिस्टीमच्या दणदणाटामध्ये तरुण, तरुणींसह काही तृतीयपंथ्यांनी अश्लील नृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले. तसेच यावेळी काही महिलांनी धुम्रपान करत मद्यपान केल्याचेही समोर आले. अशा पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांची विटंबना करणाया प्रवृत्तींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आले.

हे ही वाचा : Kolhapur : धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा; महापुरुषाचा अवमान केल्याने शिवसेना आक्रमक

जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनिल मोदी, विशाल देवकुळे, स्वरुप मांगले, तानाजी पाटील, धनाजी यादव, सर्जेराव पाटील, नरेश पाटील गजानन गावडे आदी उपस्थित हेते.

Related Stories

राजू शेट्टींनी चूकच केली ; स्वाभिमानी कार्यकर्ते बरसले

Abhijeet Shinde

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविणे हे मोठे आव्हान

Abhijeet Shinde

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपदासाठीच आघाडी

Abhijeet Shinde

शिरोळ पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता चौगुले यांच्या राजीनाम्याकडे इच्छुकांच्या नजरा

Abhijeet Shinde

मजले येथे सप्त वर्तुळाकार दगडी संरचना आली प्रकाशझोतात

Sumit Tambekar

प्रभाग रचना, आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!