मुलीच्या तिरंदाजीचे अनोखे कौशल्य
सर्वोत्तम तिरंदाजांचा मुद्दा चर्चेत आल्यावर अर्जुन अन् एकलव्य यासारख्या धनुर्धरांच्या नावांचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे. लक्ष्याकडे न पाहता देखील अचूक वेध घेता येईल इतपत ते या धनुर्विद्येत पारंगत होते. परंतु सद्यकाळात एक महिला तिरंदाज हातांनी नव्हे तर पायांनी अचूक निशाणा साधत आहे.
निश्चितपणे तिने कठोर मेहनत आणि मोठा सराव केला असेल. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात ती हातांनी नव्हे तर पायांनी तिरंदाजी करताना दिसून येते. मुलीचा जबरदस्त आत्मविश्वास अन् संतुलन पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत.
व्हिडिओत ही मुलगी प्रथम धनुष्यबाण घेऊन स्वतःच्या हातांनी लक्ष्याचा वेध घेते. त्यानंतर हातांऐवजी पायांनी लक्ष्याचा वेध घेताना दिसून येते. एका प्रयत्नात ती डोकं खाली करूनही ती अचूक निशाणा साधत होती.
या मुलीने 2015 पासून तिरंदाजीचे प्रशिक्षण सुरू केले होते. तेव्हा तिला यासंबंधी अधिक माहिती नव्हती. हळूहळू या धनुर्विद्येत ती पारंगत होत गेली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत 6 कोटीहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर 3 लाखाहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे.