Tarun Bharat

मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करताय; ही काळजी घ्या…

कोल्हापूर प्रतिनिधी:

जून महिना म्हटलं की इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळा आणि त्यासाठी बाजारपेठांमध्ये होणारी शालेय साहित्य खरेदीसाठीची गर्दी असं काहीसं चित्र डोळ्यासमोर येतं. पण हे शालेय शिक्षण साहित्य खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची हे आज आपण पाहूया.
सीबीएससी तसेच मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळा येत्या महिन्यात सुरू होणार आहेत. आत्तापासूनच बाजारपेठ मध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश तसेच टिफिन बॉक्स, वॉटरबॅग खरेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही शालेय शिक्षण साहित्य खरेदी करताना पुढील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.

👉जुना साठा खरेदी करणे टाळा.
बऱ्याच दुकानात सुरुवातीच्या दिवसात मागील वर्षीचा शैक्षणिक साहित्याचा साठा असतो. अशावेळी बुरशीसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुने साहित्य घेणे टाळावे.

👉साहीत्याचा नेमका दर किती याची पडताळणी करा.
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढल्यामुळे सर्व क्षेत्राप्रमाणे याही क्षेत्रामध्ये महागाई वाढली होती. पण सध्या इंधनाचे हे दर कमी आल्यामुळे नवीन आलेल्या शैक्षणिक साहित्यांच्या किमती कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे दिवस थांबूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करावे.


👉शाळांची शैक्षणिक धोरणाची चौकशी करा.
येणारे नवीन वर्षामध्ये अभ्यासक्रम ऑनलाईन का ऑफलाईन पद्धतीने शिकवणार आहेत याची खातरजमा करा. त्यामुळे नेमके शैक्षणिक साहित्य किती खरेदी करावे याचा अंदाज येणे शक्य होईल.


👉बोगस कंपन्या पासून सावधान राहा
बाजारपेठ मध्ये हलक्या, निकृष्ट दर्जाचा, चायना मधून आलेला साठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीवेळी जागृत असणे खूप आवश्यक आहे. असा निकृष्ट साठा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

Related Stories

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

Amit Kulkarni

हिमाचल विधानसभेत खलिस्तानी झेंडे सापडणे हे भाजपचे अपयश : मनीष सिसोदिया

Archana Banage

कोडोलीत भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला; ७५ हजाराचे नुकसान

Archana Banage

प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा

Abhijeet Khandekar

भुविकास बँक ते तहसीलदार कार्यालयादरम्यान हॉकर्सधारकांची कोरोना टेस्ट

Patil_p

म्हादईप्रश्नी आपचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni