Tarun Bharat

तलाठय़ाने मागितली 40 हजाराची लाच

प्रतिनिधी/ कराड

सातबारा उताऱयावर ऑनलाईन नाव दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 40 हजारांची लाच मागणारा कराड शहरचा तलाठी सोमवारी पकडला गेला. नाव नोंद करण्यासाठी आलेल्या नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर तलाठय़ावर कारवाई करण्यात आली. सागर पाटील (वय 32) असे तलाठय़ाचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कराड परिसरातील एक नागरिक व त्यांचे भावोजी यांनी प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटवर त्यांची ऑनलाइन सातबारा उताऱयावर नाव दुरुस्ती करायची होती. त्यासाठी तलाठी सागर पाटीलने चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, याबाबत तक्रारदार नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या विभागाच्या पोलिसांनी तक्रारीची खात्री केली. तलाठी सागर पाटील यांनी लाच मागितल्याची खात्री पटल्यावर सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक प्रशांत ताटे, विशाल खरात यांनी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठय़ावर कारवाई केली. या प्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली ;राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Archana Banage

धुमाळास निलंबीत करण्याचा ठराव

Patil_p

आवश्यक महाराष्ट्रातील पहिल्या ’शेतकरी मार्ट’चे कृषी आयुक्तांकडून सातायात उद्घाटन

Omkar B

सातारा सावरतोय; शहरात केवळ 240 सक्रीय रुग्ण

Patil_p

हॉटेल सूरू पण राजवाडा चौपाटी बंदच

Patil_p

शिव्या देणे, ही कोल्हापूरची वा महाराष्ट्राची संस्कृती नाही

datta jadhav