Tarun Bharat

बेलवडे हवेली येथे चायना बनावटीचे पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत; तळबीड पोलिसांची कारवाई

Advertisements

उंब्रज/प्रतिनिधी


उंब्रज (सातारा) : बेलवडे हवेली ता. कराड येथे चायना बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर तळबीड पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवार (दि. १) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी योगेश अंकुश पवार (वय 37) व समाधान जालिंदर देशमुख (वय 19) दोन्ही राहणार बेलवडी हवेली ता.कराड यांना ताब्यात घेतले आहे. तळबीड पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण फडतरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बेलवडे हवेली येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या बोळात संशयित योगेश पवार व समाधान देशमुख यांना पोलिसांनी पकडले. यावेळी यांच्याकेडे चायना बनावटीचे सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल सापडले. त्यांच्यावर भारतीय अधिनियम शास्त्र कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तळबीड पोलीस ठाण्याच्या जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलिसांनी ही कारवाई केली. ‌

Related Stories

युवकाचा खून करुन मृतदेह नदीत टाकला

Patil_p

महाबळेश्वर पालिकेचे बांधकाम रखडले

Patil_p

सिनेमागृहे, नाटय़गृहे प्रेक्षकांसाठी खुली होणार

Patil_p

अखेर वेदिकावर सुरू होणार उपचार; दुर्मिळ लसीसाठी 16 कोटी रुपये जमा

datta jadhav

दि.१८ रोजी पाणी पुरवठा बंद

Abhijeet Khandekar

शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

datta jadhav
error: Content is protected !!