Tarun Bharat

तालिबानचे महिला वृत्तनिवेदकांसाठी नवे फर्मान

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने महिला वृत्तनिवेदकांसाठी नवे फर्मान जारी केले आहे. वृत्तनिवेदन करणाऱ्या महिलांसह सर्व महिला मीडिया पर्सनला चेहरा झाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. तालिबानने हा आदेश सर्व मीडिया संस्थांना पाठवला आहे. तालिबान सरकारच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाने हा अंतिम निर्णय असल्याचे म्हटले आहे. (taliban government orders female news anchors to wear face coverings)

Advertisements

टोलो न्यूज या तालिबानच्या मीडिया संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिला वृत्तनिवेदक आणि सर्व मीडिया पर्सनला तालिबान सरकारच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाने चेहरा झाकणे अनिवार्य केले आहे. कोणत्याही महिला मीडिया पर्सनने त्याला विरोध केल्यास तिच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

याआधीही तालिबानने महिलांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी अनेक तुघलकी फर्मान जारी केले आहेत. तालिबानचा म्होरक्या हिबतुल्लाह अखुंदजादा याने अफगाणिस्तानात महिलांना बुरखा घालण्याचे तसेच एकटय़ा महिलेने घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले होते. सत्तेत येताच तालिबान्यांनी मुलींचे शिक्षणही बंद केले. याविरोधात महिला मैदानात उतरल्यावर त्यांनी सहावीपर्यंत मुलींना शाळेत जाण्याची परवानगी दिली आहे.

Related Stories

रशियात साडीमध्ये हिंडतेय तापसी

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांवर

datta jadhav

इराण : उपग्रह नियंत्रित शस्त्राने झाली अणुशास्त्रज्ञ फखरीजादेह यांची हत्या

datta jadhav

काबूल विमानतळाजवळ अमेरिकेचा हवाई हल्ला

Patil_p

नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा ओली

Patil_p

मुलांच्या स्थुलत्वासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स जबाबदार

Patil_p
error: Content is protected !!