निर्बंध उठल्यानंतर बापटपॅम्पममध्ये मूर्तीकारांची धांदल
कोल्हापूर / संग्राम काटकर
गेल्याच महिन्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीला केलेली बंदी शिथिल करतानाच चार दिवसांपूर्वी गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवून राज्य सरकारने मंडळांसह मूर्तीकारांनाही आनंदीत केले आहे. अनेक मंडळे बापटपॅम्पसह शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये 5 ते 11 फुटी गणेशमूर्तींच्या ऑर्डरीही देऊ लागले आहेत. त्यामुळे दोन वर्षाच्या कोरोना कालावधीत उंच गणेशमूर्तीचे थांबलेले काम व त्यामागील कोटय़वधीचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. गणेशोत्सव महिनाभरावर आल्याने मंडळांच्या पसंतीनुसार मोल्डच्या सहाय्याने उंच गणेशमूर्ती बनवण्याचा सपाटा मूर्तीकार व कामगारांच्या हातांनी लावला आहे. पीओपीपासून बनवल्या जात असलेल्या या गणेशमूर्तीचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षे गणेशात्सव काळात चार फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतानाच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन केले होते. मंडळांनी आवाहनाचा आदर करत छोटय़ा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केलीच, शिवाय फारच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करताना गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुक काढली नाही. मात्र गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची भावना वाढीस लागली होती. गेल्या दोन-तीन महिन्यापासूनच समस्त मूर्तीकारांचे पीओपीच्या गणेशमूर्तीला घातलेली बंदी कधी उठते याकडे मूर्तीकारांचं तर निर्बंध उठवून उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास कधी परवानगी मिळते याकडे मंडळाचे लक्ष्य लागून राहिले होते. मात्र गेल्या 28 जून रोजी राष्ट्रीय हरित लवादाने पीओपीच्या गणेशमूर्तीवरील बंदीला कायम करुन मूर्तीकारांना झटका दिला होता.
अलीकडेच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 21 जुलै रोजी निर्बंधाचे सारे चक्र फिरवत यंदाचा गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीच्या उंचीवर निर्बंध उठवतानाच पीओपीच्या गणेशमूर्तीवरील बंदीही शिथिल करुन मूर्तीकारांसह मंडळांना सुखद धक्काच दिला. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन गणेशोत्सवात छोटय़ा गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केलेली कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, कोकण, पंढरपूर, सांगोला, बेळगावसह कर्नाटकातील अनेक गावांमधील मंडळे खुल्या मनाने बापटपॅम्पसह पुंभार गल्ल्यांमध्ये ऊंच गणेशमूर्ती बनवून घेण्यासाठी जाऊ लागले आहेत.
पीओपीची मोठी आवक अन् कामगारांचा राबता…
ऑर्डरीनुसार बापट कॅम्पमधील मूर्तीकारांनी 5 ते 11 फुटांपर्यंत चिंतामणी, लालबागचा राजा, हनूमान, विठ्ठल, बाजीप्रभू देशपांडे, सिंहासनारुढ, फुलांत विराजमान, दगडुशेठ आदी रुपांसह शेकडो प्रकारच्या बैठी गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी मोल्ड तयार करवून घेतले आहेत. त्यामुळे मोल्ड बनवणाऱयांच्या पदरात ही चार पैसे पडले आहेत. मोल्डमधून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांकडील 7 ते 8 कामगार खूप परिश्रम घेत आहेत. दुसरीकडे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी बापटपॅम्पमध्ये मोठय़ा प्रमाणात पीओपीसह आकर्षक रंगांची आवक करण्यात आली आहे. त्याच्या सहाय्याने दिवसाला 15 ते 20 मूर्ती बनवण्याचे मूर्तीकारांनी लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या पावसाळी वातावरणात बनवल्या जाणाऱया गणेशमूर्ती सुकवण्यासाठी हिटरचाही वापर केला जात आहेत. या कामात कामगारांसोबत मूर्तीकारांचे अख्ख्ये कुंटूब व्यस्त आहे. मूर्ती जशा सुकू लागल्या आहेत, तशा त्या होलसेल दराने खरेदी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, बेळगाव, कर्नाटकातील मूर्तीकार बापटपॅम्पमध्ये दाखल होऊ लागले आहेत. या मूर्ती आपल्या गावी नेऊन तेथील मंडळांना त्या रंगवून दिल्या जाणार आहेत. परगावाला गणेशमूर्ती पाठवून झाल्या की कोल्हापूर व परिसरातील गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला हात घातला जाणार असल्याचे मूर्तीकार सांगताहेत.
रात्रीचा दिवस करावा लागणार…
राज्य सरकारने पीओपी व उंच गणेशमूर्तीवरील निर्बंध उठवले जाणे हे कोल्हापूर जिह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील मूर्तीकारांच्या दृष्टीने हिताचे झाले आहे. परगावची मंडळे मनपसंतीच्या मूर्ती बनवून घेऊ लागल्याने मूर्तीकारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी मंडळांकडून अचानकपणे येत असलेल्या ऑर्डरीनुसार गणेशमूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांसह कामगारांना आता रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.
मिनाक्षी कुंभार (मूर्तीकार-बापटपॅम्प)