गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये कुटुंबाची नोंद
अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये राहणाऱया ट्रप कुटुंबाच्या प्रत्येक सदस्य गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा हिस्सा ठरला आहे. हा विक्रम त्यांच्या उंचीसंबंधीचा आहे. कुटुंबातील 5 सदस्य स्कॉट, क्रिसी, सवाना, मौली आणि ऍडमची सरासरी उंची 203.29 सेंटीमीटर म्हणजेच 6 फूट 8 इंच इतकी आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार ट्रप कुटुंब संयुक्तपणे जगातील सर्वात उंच कुटुंब आहे.
अधिकृतपणे हा विक्रम आमच्या नावावर झाला आहे, माझ्या बहिणीने फोन करून याबद्दल आम्हाला कळविले. प्रथम यावर विश्वास ठेवणे आमच्यासाठी अवघड होते असे ऍडमने म्हटले आहे.
कुटुंबात ऍडम ट्रप सर्वात कमी वयाचा सदस्य आहे, वयाच्या 22 व्या वर्षी त्याची उंची 7 फूट 3 इंच इतकी आहे. त्यानंतर 27 वर्षीय सवाना ट्रप-ब्लांचफील्ड 6 फूट 8 इंच उंचीची आहे. तिची 24 वर्षीय बहिण मौली स्टीडची उंची 6 फूट 6 इंच आहे. या कुटुंबात या तिघांच्या आईचे नाव क्रिसी असून त्यांची उंची 6 फूट 3 इंच इतकी आहे. तर वडिल स्कॉट हे 6 फूट 8 इंच उंचीचे आहेत.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सपर्यंत पोहोचण्याची कल्पना ऍडमची होती. डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण कुटुंब डॉ. एना सुदोह यांना भेटले. डॉक्टरने योग्यप्रकारे उंची मोजण्यासाठी पुटंबातील प्रत्येक सदस्याला दिवसभरात तीनवेळा मोजमाप करण्यात आले. उंचीवरून गोंधळ राहू नये म्हणून सर्वांचे स्टँडिंग पोझिशन आणि आडवे झोपवून उंची मोजण्यात आली. या कुटुंबाला स्वतःच्या उंचीमुळे अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते.