तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मंडप सजावटीसाठी लगबग : गणरायाचे जल्लोषात होणार स्वागत
वार्ताहर /किणये
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे साऱयांनीच गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले असून शहराबरोबरच बेळगाव तालुकाही आता लाडक्मया बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
तालुक्मयाच्या प्रत्येक गावांमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळाच्यावतीने गणेशोत्सवाची तयारी जोमाने करण्यात आलेली आहे. तसेच घरगुती गणपतीसाठी आकर्षक अशा सजावटी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी बेळगाव शहराच्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झालेली होती याचबरोबर तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येही गणेशोत्सवाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी भाविक मोठय़ा प्रमाणात आलेले होते. ग्रामीण भागातील पिरनवाडी, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, काकती, हालगा, बेळगुंदी आदी गावातील बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदी करताना नागरिक दिसत होते.
गणपतीच्या पूजनासाठी लागणारी पाच फळे, नारळ, केळी, फुलहार तसेच सजावटीसाठी लागणारे तोरण, झुंबर विविध आकर्षक वस्तू याचबरोबर सजावटीसाठी लागणारे विद्युत साहित्य आदींसह पूजेसाठी लागणाऱया साहित्याची खरेदी मंगळवारी मोठय़ा प्रमाणात सुरू होती.
मंडप सजावटीसाठी तरुणांची लगबग
पंधरा दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडपाची सजावट करण्यात मग्न आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मंडप सजावटीसाठी तरुणांची लगबग सुरू होती. वडगाव ग्रामीण पोलिसांनी गावोगावी सार्वजनिक मंडळाच्या बैठका घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
काही गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची श्रीमूर्ती बाहेरगावाहून आणण्यात आलेली आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी काही ठिकाणी गणरायाचे आगमन झाले असल्याचे दिसून आले. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक घराघरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती गणेश मूर्तीसाठी विविध प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे.
साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
मंगळवारी दिवसभर पिरनवाडी व मच्छे येथील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. यामध्ये पाच फळे 70 ते 120 रुपये, केळी 40 ते 60 रुपये डझन, नारळ 30 रुपये अशा पद्धतीने फळांची विक्री सुरू होती. तसेच फुलहार 30 रुपये ते दीडशे रुपये याप्रमाणे विक्री करण्यात येत होता. गेल्या 8-10 दिवसांपासून ढोल ताशा व विविध पारंपरिक वाद्यांचा सरावही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार बुधवारी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.