वार्ताहर /उचगाव
सार्वजनिक शिक्षण खाते तालुका रेंज बेळगाव यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक तालुका पातळीवरील ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धांना जिल्हा क्रीडांगणावर शुक्रवारी शानदार प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी मेदार उपस्थित होते.
प्रारंभी डाएटचे प्राचार्य सिंदुर यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. कडोलीचे राज्यस्तरीय खेळाडू आदर्श धायगोंडे, नागेश अनगोळकर, सृष्टी मुतगेकर, समीक्षा यांनी क्रीडाज्योत क्रीडांगणावर फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. बोर्ड ऑफ हेडमास्टरचे अध्यक्ष एस. एस. मठद, रामू गुगवाड यांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व खेळाडूंना रमेश अलगुंडीकर यांनी शपथ दिली.
तालुका शारीरिक शिक्षणाधिकारी एस. एच. हंचनाळ, जयकुमार हेब्बळी, मलगौडा पाटील, फाल्गुन, पी. के. शेळके, अन्वर लंगोटी, एन. ओ. चौगुले याप्रसंगी उपस्थित होते.