सावंतवाडी / प्रतिनिधी-
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग ,तालुका पंचायत समिती सावंतवाडी आयोजित ४९ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे सोमवार १२ व १३ रोजी करण्यात आले आहे.सोमवार 12 रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील, साहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण , गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात 6 वी ते 8 वी आठवी ते बारावी या दोन गटांसाठी विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन , निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर अध्यापक निर्मित आणि प्रयोगशाळा सहाय्यक परिचर निर्मित व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर निर्मित विज्ञान प्रतिकृतीचे प्रदर्शन, सहभाग व नोंदणी होणार आहे.दुपारच्या सत्रात विज्ञान मेळावा होणार आहे.