तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /उचगाव
सार्वजनिक शिक्षण खाते तालुकाविभाग बेळगाव यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा गुरूवार दि. 4 ऑगस्ट ते शुक्रवार दि. 2 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका गट शिक्षणाधिकारी जुट्टण्णावर होते.
या बैठकीत तालुकास्तरीय स्पर्धा भरविण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षणाधिकारी हंचनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. 4 व 5 ऑगस्ट रोजी मुला-मुलींसाठी योगा, नेट बॉल, हॅण्डबॉल, लॉन टेनिस, बॉल बॅडमिंटन स्पर्धा डिवाईन मर्सी मच्छे येथे घेण्यात येणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी मुला-मुलींची जलतरण स्पर्धा मनपा जलतरण तलाव गोवावेस येथे, 8 ऑगस्ट रोजी मुलामुलींची शटल बॅडमिंटन स्पर्धा कर्नाटक पब्लिक स्कूल केके कोप्प येथे, 10 व 11 ऑगस्ट रोजी मुलामुलींसाठी कराटे, कुस्ती, बुद्धीबळ, ज्युडो, जिमनॅस्टिक, हॉकी, फुटबॉल, व थ्रोबॉल शिवाजी हायस्कूल कडोली व सरकारी प्रौढ शाळा कडोली येथे, 17 व 18 ऑगस्ट रोजी मुलामुलींसाठी बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कब्बड्डी व खो-खो निर्मल प्रौढ शाळा निर्मल नगर येथे, 2 व 3 सप्टेंबर रोजी ऍथलेटीक्स स्पर्धा जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे. विभागिय स्पर्धेत पहिला-दुसरा क्रमांक मिळवणाऱया खेळाडूंसह सांघिक विजेत्या संघांनी याची दखल घ्यावी.