Tamboli’s Swaradhara Bhajan Mandal first
सुकळवाड श्री ब्राह्मण देव सेवा समितीतर्फे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत तांबोळीचे स्वरधारा प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर वडखोलचे सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ द्वितीय , कसालच्या नादब्रह्म प्रसादिक भजन मंडळांनी तृतीय क्रमांक पटकावला . श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मण च्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला. सर्व विजेत्या भजन मंडळांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र चषक देऊन गौरवण्यात आले. तर सर्व सहभागी भजन मंडळांना रोख मानधन व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पुरस्कर्ते राजन पावस्कर, सरपंच युवराज गरुड, अनिल पालकर, उपाध्यक्ष प्रकाश राऊळ ,सचिव किशोर पेडणेकर, कोषाध्यक्ष संतोष पाताडे, बाबुराव मसूरकर, विलास पेडणेकर, रुपेश गरुड, नागेश पाताडे, बाळा टेंबुलकर, विलास मसुरकर, संतोष बिलये , प्रसाद वायंगणकर, भाऊ पाताडे, देविदास प्रभूखोत ,स्पर्धा मार्गदर्शक अरुण पालकर ,परीक्षक अजित गोसावी आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी डिगस