Tarun Bharat

आनंद महिंद्रा यांची वचनपूर्ती; इडली अम्माला दिले नवीन घर भेट

ऑनलाईन टिम : मुंबई

तामिळनाडूच्या इडली अम्माला स्वतःचे घर भेट देण्याचे वचन पूर्ण केल्याने उद्योगपती आनंद महिंद्रा पुन्हा लोकांचे आकर्षणाचे ठरले आहेत. आनंद महिंद्रा यांनी एप्रिल 2021 मध्ये एक ट्विट करून सूचित केले होते की इडली अम्मा लवकरच लोकांना स्वतःच्या नविन घरातून तिचे प्रसिद्ध घरगुती जेवण देईल.

आज मदर्स डेच्या दिवशी, महिंद्राने इडली अम्मा तिच्या नवीन घरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर केरून आपला शब्द खरा केला. “‘मदर्स डे’ च्या दिवशी इडली अम्माला भेट देण्यासाठी घराचे बांधकाम वेळेत पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे अभिनंदन. ईडली अम्मा पालनपोषण, काळजी घेणारी आणि निस्वार्थी अशा आईच्या सद्गुणांचे मूर्त रूप आहे. तिला आणि तिच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा!” अशा भावना आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली.

इडली अम्मा, तामिळनाडूमधील पेरूजवळील वाडीवेलमपालयम या गावात राहते. तिला कमलाथल म्हणूनही ओळखले जाते. ती सुमारे ३७ वर्षांपासून सांभर आणि चटणीसोबत इडली फक्त १ रुपयात विकते.

Related Stories

राहुल गांधींच्या प.बंगालमधील सर्व सभा रद्द

datta jadhav

कितीही सैन्य तैनात करा, नाही बदलणार स्थिती!

Patil_p

भारत-अमेरिका संरक्षण गट स्थापणार

Patil_p

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पांडुरंगचरणी ‘हे’ साकडं

Tousif Mujawar

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर

Archana Banage

Mumbai Drugs Case: अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल

Archana Banage