ऑनलाईन टीम / तंजावर :
तामिळनाडूतील तंजावर (Tanjawar Tamilnadu) जिल्ह्यातील कालिमेडू (kalimedu) शहरात रथउत्सवादरम्यान विजेचा शॉक लागून 11 भाविकांचा मृत्यू (11 people died) झाला. तर 15 जण (injured) जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
तंजावरमधील एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान देवाचा रथ विजेच्या तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे विजेचा प्रवाह पसरला. रथासोबतच्या भाविकांना विजेचा शॉक लागताच आरडाओरडा सुरू झाली. चेंगराचेंगरीही झाली. यावेळी शॉक लागून 11 भाविकांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना तंजावर येथीलच मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.