Tarun Bharat

बांगलादेशच्या डावात तमिम इक्बालचे शतक

Advertisements

वृत्तसंस्था/ चित्तगाँग

तमिम इक्बालचे शानदार शतक तसेच लिटॉन दास आणि मुस्तफिजुर रहीम व मेहमुदुल हसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान बांगलादेशने लंकेविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या तिसऱया दिवशी पहिल्या डावात 3 बाद 318 धावा जमवित चोख प्रत्युत्तर दिले. या कसोटीत लंकेने आपल्या पहिल्या  डावात 397 धावा जमविल्या आहेत.

बांगलादेशने बिनबाद 76 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. सलामीच्या मेहमुदुल हसन आणि तमिम इक्बाल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 162 धावांची भागिदारी केली. असिता फर्नांडोने मेहमुदुल हसनला झेलबाद केले. त्याने 142 चेंडूत 9 चौकारांसह 58 धावा झळकविल्या. बांगलादेशने यानंतर आपला दुसरा बळी पाठोपाठ गमविला. लंकेच्या रजिताने नजमुल हुसेनला केवळ एका धावेवर झेलबाद केले. कर्णधार मोमीनुल हक्क रजिताच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने दोन धावा जमविल्या तर बांगलादेशची स्थिती यावेळी 3 बाद 184 अशी होती.

बांगलादेशच्या तमिम इक्लबालने चहापनापूर्वी आपले कसोटीतील दहावे शतक झळकविले. असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर इक्बालने चौकार आणि एकेरी धाव घेत हे शतक पूर्ण केले. तमिम इक्बालच्या शतकामध्ये 15 चौकारांचा समावेश आहे. दुखापतीमुळे तमिम इक्बाल 133 धावांवर असताना निवृत्त झाला, त्यावेळी बांगलादेशने 3 बाद 220 धावा जमविल्या होत्या. मुस्तफिजुर रहीम व लिटॉन दास यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 98 धावांची भागिदारी केली. लिटॉन दासचे हे कसोटीतील 12 वे तर मुस्तफिजुर रहीमचे कसोटीतील हे 26 वे अर्धशतक आहे. दिवसअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 107 षटकांत 3 बाद 118 धावा जमविल्या असून रहीम दोन चौकारांसह 53 तर दास आठ चौकारांसह 54 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे रजिताने 2 तर असिता फर्नांडोने 1 गडी बाद केला. बांगलादेशचा संघ अद्याप 79 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव सर्वबाद  397, बांगलादेश प. डाव 107 षटकांत 3 बाद 318 (मेहमुदुल हसन 58, तमिम इक्बाल दुखापतीमुळे निवृत्त 133, मुस्तफिजुर रहीम खेळत आहे. 53, लिटॉन दास खेळत आहे 54, रजिता 2-17, असिता फर्नांडो 1-55).

Related Stories

तामिळ थलैवाज-युपी योद्धा यांच्यात आज महत्त्वाची लढत

Patil_p

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

Patil_p

निर्णय माझे, श्रेय मात्र इतरांनी लाटले!

Amit Kulkarni

मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

Patil_p

मिडलसेक्स संघाच्या प्रशिक्षकपदी जॉन्सन

Patil_p

माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली कालवश

Patil_p
error: Content is protected !!