डेनेजचे काम संथगतीने, नागरिकांतून संताप
प्रतिनिधी / बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक मागील काही महिन्यांपासून डेनेजचे काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याचा अत्यंत थोडा भाग वाहतुकीसाठी खुला असल्यामुळे तेथूनच वाहनचालक वाहने रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असून, हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर या परिसरातील डेनेजच्या कामाला सुरुवात झाली. काँक्रिटच्या गटारीचे बांधकाम केले जात असल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. यामुळे स्थानिक रहिवाशांना एकतर कपिलेश्वर ओव्हरब्रिज अथवा जुना धारवाड रोडवरील ओव्हरब्रिजवरून माघारी यावे लागत होते. दोन महिने उलटले तरी गटारी बांधण्याचे काम अद्याप सुरूच आहे. यामुळे मोठी वाहने या ठिकाणी येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत. दुचाकी वाहनांना येण्या-जाण्यास वाट सोडण्यात आली असली तरी यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्मयात
गटारीचे बांधकाम केले जात असल्याने गटारीचे पाणी अडविण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्मयात आले असून, गटारी बांधण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.