Tarun Bharat

‘हाफकिन’बद्द्ल बोललेलो वक्तव्य दाखवा राजीनामा देतो; तानाजी सावंतांच चॅलेंज

Advertisements

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत ‘हाफकीन’ या वक्तव्याने सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. काल सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना हाफकीन विषयी विचारताच त्यांचा पार चढला. तुम्ही ट्रोल होताय अस सांगताच त्यांची आगपाखड झाली. यावेळी त्य़ांनी संताप व्यक्त केला. हाफकिनबद्द्ल बोललेलो वक्तव्य दाखवा राजीनामा देतो अस चॅलेंज त्यांनी यावेळी दिलं.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राज्यातील सत्त्तांतर पचनी पडत नसल्याने विरोधकांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मी उच्चशिक्षित आहे मुद्दाम मला टार्गेट केलं जातंय. मी सोलापूरमध्ये शालेय शिक्षणात मिरीटमध्ये आलेला व्यक्ती आहे. तिनशे पी.एच.डी धारक माझ्या हाताखाली काम करतात. मी अंगटेबहाद्दूर मंत्री वाटलो का? हाफकिनबद्द्ल बोललेलो वक्तव्य दाखवा राजीनामा देतो अस चॅलेंज त्यांनी केल.

नेमक काय घडल.
तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. ससून रुग्णालयात फिरत असताना तानाजी सावंत यांनी रुग्णांशी संवाद साधला. तेव्हा रुग्णालयात औषधे कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. तानाजी सावंत यांनी डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. हाफकीनकडून वेळेत औषधे मिळत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले. त्यावर तानाजी सावंत सर्वांदेखत म्हणाले की, तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा. हे वाक्ये ऐकताच डॉक्टरांना हसू आवरत नव्हते. या सगळ्या घटनेचं वृत्त विविध माध्यमांनी छापलं होतं.

Related Stories

भारतात आता लोकशाही राहिली आहे का? : प्रियांका गांधी

prashant_c

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

prashant_c

काळम्मावाडी थेट पाईपलाईन कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Archana Banage

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात संचारबंदी लागू

Archana Banage

वाईत बाधिताची नैराश्येतून आत्महत्या

Patil_p

कर्नाटक: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सक्तीने चाचणी करण्याची गरज: मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage
error: Content is protected !!