वृत्तसंस्था /तैपेई (तैवान)
येथे सुरू असलेल्या तैपेई खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा पेस्टो यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान शुक्रवारी समाप्त झाले.
शुक्रवारी मिश्र दुहेरीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या हू पेंग रॉन आणि तो ई वेई या जोडीने इशान आणि तनिषा यांचा 21-19, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. गुरुवारी या स्पर्धेत इशान आणि तनिषा या भारतीय जोडीने उपात्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना चेंग वेन आणि वेंग झियाओ यांचा 21-14, 21-17 असा पराभव केला होता. आता या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा पी. काश्यप या एकमेव बॅडमिंटनपटूचे आव्हान जिवंत राहिले आहे.