कॅडेट सबज्युनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यप्रदेश येथे 83 व्या कॅडेट व सबज्युनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का काळभैरवला उपविजेतेपद मिळाले. अंतिम फेरीत अग्रमानांकित अंकोलिका चक्रवर्तीकडून तिला पराभव पत्करावा लागला. तनिष्का ही कॅडेट गटात रौप्य पदक मिळविणारी बेळगावची पहिलीच टेनिसपटू आहे.
कॅडेट सबज्युनिअर राष्ट्रीय टेटे स्पर्धेत तनिष्का काळभैरवने पात्रता फेरीत लोटीया खासवीसचा 11-6, 11-5, 11-2 तर दुसऱया सामन्यात कशवी जैनचा 11-0, 11-0, 11-1 असा पराभव करुन मुख्य स्पर्धेत प्रवेश केला. प्रमुख ड्रॉमध्ये तनिष्काने साहीदा सर्किकचा 9-11, 11-3, 11-6, 8-11, 11-4, दुसऱया फेरीत अश्वित मायाचा 11-8, 11-2, 11-6, शेवटच्या आठ फेरीत प्रणवी सेठ-बीएनजीए हिचा कडक्या लढतीत 7-11, 12-10, 11-7, 11-7, 11-4, 11-8 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत तिसऱया मानांकित रंजिनी शहा-बीएनजीए हिचा 7-11, 12-10, 11-13, 11-4, 11-8 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तनिष्काला अग्रमानांकित अंकोलिका चक्रवर्ती-बीएनजीए हिच्याकडून 12-10, 11-5, 11-4 असा पराभव पत्करावा लागला. मात्र अंतिम फेरीत धडक मारणाऱया तनिष्काचा खास गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी तनिष्काला रौप्यपदक, चषक, प्रमाणपत्र, रोख 4000 रुपये देवून गौरविण्यात आले. तनिष्काला टेटे प्रशिक्षक संगम बैलूर व राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू संजीव हम्मण्णावर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.