Tarun Bharat

तनया आरोलकर हिचा लोकमान्यतर्फे सत्कार

आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून लोकमान्यने केला सर्वप्रथम सन्मान

वार्ताहर/वेंगुर्ले

Advertisements

आंतर राष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी शाखा वेंगुर्लेतर्फे शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ यांच्या हस्ते सर्वात लहान वयांत आयुष मंत्रालय, दिल्ली यांचेकडून योगाटीचर म्हणून पदवी प्राप्त झालेल्या व योगाचा प्रचार व प्रसारासाठी कार्यरत झालेल्या उभादांडा गावची सुकन्या कु. तनया रामदास आरोलकर हिचा सर्वप्रथम शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला.

लोकमान्य मल्टीपर्पज को-आँपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी नेहमीच समाजातील घडणाऱ्या चांगल्या गोष्टीची दखल घेऊन संबधितांचा सन्मान करीत प्रोत्साहन देते. त्यानुसार कांही महिन्यांपूर्वी आयुष मंत्रालयामार्फत होणाऱ्या योगाटीचर यासाठी परीक्षा दिलेल्या व त्यांना ती पदवी प्राप्त झालेल्या उभादांडा-सिध्देश्वरवाडी येथील कन्या कु. तनया रामदास आरोलकर हि पुणे येथून मंगळवारी आंतरराष्ट्रीय योगादिनी वेंगुर्लेत दाखल होताच तिचा लोकमान्य मल्टीपर्पज को-आँपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी, शाखा वेंगुर्लेतर्फे शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ व भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा आरोग्यम फार्मा शाँपीचे संचालक संजय पुनाळेकर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यांत आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत लोकमान्य मल्टीपर्पज को-आँपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी, शाखा वेंगुर्लेचे शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ, भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी संजय पुनाळेकर,  रामदास आरोलकर, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष के. जी. गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य भरत सातोस्कर, लोकमान्य पतसंस्थेचे कर्मचारी चक्रपाणी गवंडी, प्रिया दाभोलकर-करंगुटकर, स्नेहल गांवकर, प्रकाश मालवणकर, प्रेरणा सामंत यांचा समावेश होता.

यावेळी योगाटीचर कु. तनया आरोलकर हिने लोकमान्य सोसायटीने माझा सामाजिक जाणीवेतून सन्मान केला तो माझ्या आयुष्यात मी कधीही विसरणार नाहि. योगाचा उपक्रम राबवून प्रचार व प्रसार करून प्रत्येक व्यक्ती निरोगी रहाण्यासाठी काम करणार आहे असे स्पष्ट केले.

Related Stories

अखेर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा महिनाभराने ‘कामथे’ला पुरवठा

Patil_p

…ही आठवणही ओलांडू देत नाही रस्ता! आवानओलच्या कविसंमेलनात ‘वर्दळी’च्या घुसमटीचे चिंतन

Abhijeet Shinde

वेंगुर्लेत शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

Ganeshprasad Gogate

रिफायनरी समर्थकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्यास खासदारांचा नकार

Patil_p

कारवाईमुळे जलक्रीडा पर्यटन व्यावसायिक आक्रमक

NIKHIL_N

मुख्यमंत्री ठाकरे जसे आले तसे निघून गेले!

Patil_p
error: Content is protected !!