थ्रिलर चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका
तारा सुतारिया सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलेन रिटर्न्स’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात ताराने एक गाणेही म्हटले आहे. ताराला आता आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’द्वारे कारकीर्दीस सुरुवात करणाऱया ताराने आतापर्यंत कुठल्या न कुठल्या अभिनेत्रीसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आता ती मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. स्टार स्टुडिओज आणि सिने1 स्टुडिओजने तारासोबतच्या ‘अपूर्वा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ताराच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश भट करणार आहेत.
याहून अधिक चांगल्या पटकथेची मी मागणी करू शकत नव्हते. एक नवोदित अभिनेत्री म्हणून अपूर्वाची भूमिका साकारण्यास सक्षम असल्याचा गर्व आहे. धैर्य अन् शक्तीचा संगम असणाऱया एका युवतीची ही कहाणी असल्याचे ताराने म्हटले आहे.
तारा अत्यंत प्रतिभाशाली असून निखिल भट यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात तिला सादर करणे रोमांचक ठरणार आहे. ही कहाणी मोठय़ा पडद्यावर आणण्यासाठी स्टार स्टुडिओज आणि पूर्ण टीमसोबत सहकार्य करण्याचा अनुभव खरोखरच चांगला राहिला असल्याचे सिने1 स्टुडिओजचे मुराद खेतानी यांनी म्हटले आहे.