Tarun Bharat

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरूच ; २ काश्मिरी पंडितांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगचा (Target killing) प्रकार सुरूच आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार करत एका काश्मिरी पंडितांची हत्या केली आहे. तर एकजण जखमी आहे. शोपियन येथे सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी दोन भावांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून स्थलांतरितांना लक्ष्य केलं जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (Target killing again in Jammu and Kashmir two Kashmiri Hindus killed by terrorists)

दरम्यान, दहशतवाद्यांन गोळीबार केलेले दोघेही काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) असून दोघेही सख्खे भाऊ आहे. सुनील कुमार भट्ट असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर पिंटू कुमार भट्ट असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

वारंवार होत असलेल्या या टार्गेट किलिंगमुळं काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. यापार्श्वभूमीवर काश्मीरमधील हिंदूंनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. यापूर्वी काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं होतं. यावरुन अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

Related Stories

गव्हावरील निर्यातबंदी शिथील

Patil_p

माजी खासदार सी. जंगा रेड्डी यांचे निधन

Patil_p

बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ पी.एन.जोशी यांचे निधन

datta jadhav

महाराष्ट्रात काल 7,620 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

जगदीप धनखड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Patil_p

‘80 विरुद्ध 2’ची होणार निवडणूक

Patil_p
error: Content is protected !!