Tarun Bharat

केएमएफ-24 अंतर्गत मालमत्तांची माहिती घेण्यासाठी टार्गेट

174 कर्मचाऱयांना 56 दिवसात 1लाख 40 हजार मालमत्ताचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिका व्याप्तीमधील मालमत्तांचे सर्वेक्षण करून केएमएफ-24 अंतर्गत नोंद करण्याची सूचना शासनाने केली आहे. याकरिता महापालिकेने पाऊले उचलली असून शहर आणि उपनगरांतील 1 लाख 40 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण 56 दिवसांत करण्याचे टार्गेट 174 कर्मचाऱयांना देण्यात आले आहे. त्यामुळे दररोज 40 हून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण मनपाच्या कर्मचाऱयांना करावे लागणार आहे.

महापालिका व्याप्तीमधील मालमत्तांची नोंद ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच मालमत्तांची माहिती ई-अस्ती प्रणालीवर करण्यात येत असताना आता कर्नाटक म्युन्सिपल फॉर्म-24 (केएमएफ-24) अंतर्गत करण्याची सूचना नगरविकास खात्याने केली आहे. याकरिता सुवर्णसौध येथे कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यात आले होते. आता याअंतर्गत नव्या मालमत्तांची माहिती घेऊन मोजमाप करून नोंद करणे, तसेच जुन्या मालमत्तांच्या नोंदीची शहानिशा करण्यात येणार आहे. जर जुन्या इमारतीच्या बांधकामात वाढ झाल्यास त्याची नोंद घेऊन कर आकारणीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तसेच केएमएफ-24 अंतर्गत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे.

शहरात 1 लाख 40 हजार मालमत्ता असून या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यासाठी 58 वॉर्डांकरिता महापालिकेतील 174 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डकरिता तीन कर्मचाऱयांकडे माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दि. 4 नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. दि. 31 डिसेंबर अखेरपर्यंत सर्व मालमत्तांची माहिती घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका व्याप्तीमधील 1 लाख 40 हजार मालमत्ताचे सर्वेक्षण 56 दिवसांत पूर्ण करण्याचे टार्गेट 174 कर्मचाऱयांना दिले आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमधील पथकाला दररोज 40 मालमत्तांचे मोजमाप करून माहिती घ्यावी लागणार आहे.

सध्या महसूल निरीक्षकांना पीआयडी लॉगईन आयडी देण्यात आली नसल्याने मुख्य कार्यालयात येवून महसूल उपायुक्तांकडून फाईल मंजूर करून घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे विविध विभागात काम करणाऱया महसूल विभागातील कर्मचाऱयांना मुख्य कार्यालयात यावे लागते. अशातच आता सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नागरिकांची कामे कधी होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रत्येक वॉर्डच्या कर्मचाऱयांना टार्गेट देण्यात आल्याने पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

Related Stories

खानापूर तालुक्यात 2184 उमेदवार ग्रा. पं. निवडणूक रिंगणात

Patil_p

मंगळवारी जिल्हय़ात 1053 नवे रुग्ण

Amit Kulkarni

विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

Amit Kulkarni

किणये, सावगावात दुर्गामाता दौड जल्लोषात

Amit Kulkarni

रेल्वे प्रवासात मास्क न घातल्यास पाचशे रुपये दंड

Patil_p

गुडस्शेड रोडवरील ‘तो’ खड्डा तातडीने बुजवा

Amit Kulkarni