केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन मोर्चेबांधणी सुरू
प्रतिनिधी/ पणजी
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात सुमारे 140 जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यातील किमान 100 जागा तरी भाजपाला मिळाव्यात म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत गमावलेली दक्षिण गोव्यातील जागा 2024 लोकसभा निवडणुकीत ही जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने यावेळेस केले आहे, असे केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
पणजीत शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणे बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, उपाध्यक्ष बाबू कवळेककर, खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर व दामू नाईक उपस्थित होते.
दक्षिण गोव्यात भाजपचे 12 आमदार आहेत त्यामुळे गमावलेली दहा हजार मते भरून काढणे कठीण नाही, मात्र आम्हाला मताधिक्य वाढवायचे आहे. त्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
2024 लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या दोन्ही जागा जिंकून आणण्याची जबाबदारी भाजपाने नारायण राणे यांच्या खांद्यावर दिली असल्याने गेल्या दोन दिवसापासून ते गोवा भेटीवर आले आहेत.
त्यांनी गोव्यात आल्यापासून दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी तसेच भाजपच्या आमदारांशी सभा घेतल्या व उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध विषयांवर चर्चा केली. दक्षिण गोव्यातील उमेदवार कोण असेल याबाबत त्यांनी कोणतीही माहिती देली नाही. निवडणुकीच्या तयारीसाठी आपण वारंवार गोव्यात येणार असून 2024 मध्ये परत जाताना गोव्यातील दोन्ही जागा जिंकूनच जाणार असल्याचा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
वाढत्या महागाईबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, 2024 पर्यंत समतोल परिस्थिती निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करणार. आजच्या घडीला लोकसभेची तयारी सुरू झाली असून विजयाच्या दिशेने भाजपा तयारी करीत आहे. दक्षिण गोव्यात भाजपचे 12 आमदार आहेत ही संख्या वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणारः राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाचा विकास करीत असून आज भारतदेश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. गोव्यात सुक्ष्म, छोटे आणि मध्यम व्यवसायांसाठी (एमएसएमई) तसेच गोव्यातील व्यवसायिकांसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून प्रशिक्षण