ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
सोमवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशानुसार माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण कपूर, हिमाचल प्रदेश केडरचे 1987-बॅचचे IAS अधिकारी असून, 30 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कपूर यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) भारत सरकारच्या सचिव पदावर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे, ही नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल असे कार्मिक मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
तसेच वरिष्ठ नोकरशहा हरी रंजन राव आणि आतिश चंद्र यांची पंतप्रधान कार्यालयात (PMO) अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.