चंदूर प्रतिनिधी
रुई येथे काल म्हसोबा माळ येथील कमलाकर गल्लीमध्ये झालेल्या हाणामारीत प्रकाश लक्ष्मण माने ( वय 66 ) यांचा मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी मारुती सिद्धू चंपू (वय 45)रुई येथे सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर आहेत .त्यांच्याकडे विनोद प्रकाश माने याने कामाला येतो म्हणून रुपये 32 हजार इतका ऍडव्हान्स घेतला होता. पैसे घेऊनही आठ दिवसापासून कामावर येण्यास टाळाटाळ करत असलयाने संशयित आरोपी त्याचा जाब विचारण्यासाठी विनोद माने यांच्या घरी गेला असता दोघांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली. संशयित आरोपी हा विनोद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे पाहून त्याचे वडील प्रकाश लक्ष्मण माने हे भांडण सोडविण्यास गेले. यावेळी संशयित आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली, त्यामुळे ते फरशीवर पडून जागीच मयत झाले. याबाबत नातेवाइकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक बीबी महामुनी, पोलीस निरीक्षक के .एन .पाटील, बीट अंमलदार सुरजीत चव्हाण,पोलीस पाटील नितेश तराळ आदींनी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.