वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉकमध्ये झालेल्या थॉमस चषक सांघिक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय बॅडमिंटन संघाला अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या तब्बल 73 वर्षांच्या इतिहासामध्ये भारताने पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळविण्याचा पराक्रम केला. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारताने बलाढय़ इंडोनेशियाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. थॉमस चषक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाला रविवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी 1 कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे या संघाला 1 कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष हिक्तांता विश्वा शर्मा यांनी दिली आहे. भारतीय बॅडमिंटन संघाला सहाय्य करणाऱया इतर प्रशिक्षक वर्गाला 20 लाख रूपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी 67.19 कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे.