Tarun Bharat

तस्कर-कस्टम संघर्षाचा माहिती खजिना पणजीत

Advertisements

सीमाशुल्क खात्याचे देशातील पहिले संग्रहालय : अर्थमंत्री सीतारामण यांच्या हस्ते 11 रोजी उद्घाटन

प्रतिनिधी /पणजी

भारतीय सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर खात्याचे देशातील आपल्या पद्धतीचे पहिले संग्रहालय असण्याचा बहुमान गोव्याला प्राप्त झाला आहे. या संग्रहालयाचे अद्ययावत पद्धतीने नुतनीकरण करण्यात आले असून अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याहस्ते दि. 11 जून रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.

राजधानीतील मांडवी नदी किनारी प्रसिद्ध दयानंद बांदोडकर मार्गावर प्रशस्त अशा पोर्तुगीजकालीन ’निळ्या’ इमारतीत हे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. यापूर्वी वर्ष 1962 पासून 2003 पर्यंत या वारसा इमारतीचा भारतीय सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर खात्याचे मुख्यालय म्हणून वापर होत होता.

निळय़ा रंगातील ऐतिहासिक वास्तू

गोव्यात पोर्तुगीजांच्या सत्ताकाळात वर्ष 1600 च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या प्रति÷ित इमारतीची 1800 च्या दरम्यान पुनर्बांधणी करण्यात आली. मुक्तीनंतर तिला पिवळा रंग देण्यात आला. त्यानंतर ती पांढऱया रंगाने रंगविण्यात आली. सध्या ती नील रंगाने रंगली आहे. पुनर्बांधणी नंतर या इमारतीचा ’कस्टम हाऊस’ म्हणून वापर करण्यात येत होता. 12 वर्षांपूर्वी तेथे संग्रहालय स्थापन करण्यात आले होते.

संग्रहालयात देशातील पहिली जीएसटी गॅलरी

पोर्तुगीज काळातील अमूल्य वारशांपैकी एक असलेल्या या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या संग्रहालयात जप्त केलेल्या वस्तू तसेच विभागाने वापरलेल्या वस्तूंचा संग्रह आहे. आता नूतनीकरण करण्यात आलेल्या संग्रहालयात देशातील पहिली जीएसटी गॅलरी देखील जोडली गेली आहे.

कस्टम अधिकाऱयांच्या संघर्षाचा इतिहास

ड्रग्ज, सोने, हिरे, घडय़ाळे, चलनी नोटा इ. वस्तुंची तस्करी करण्यासाठी तस्करांनी वापरलेल्या विविध युक्त्या दाखविणारी प्रत्यक्ष घटनांवर आधारित समर्पित गॅलरी आणि तस्करांसोबत दोन हात केलेल्या धाडसी कस्टम अधिकाऱयांची बुद्धिमत्ता आणि दक्षता दाखवणारी छायाचित्रेही मांडण्यात आली आहेत.

पुरातन वास्तू आणि कलावस्तुंचा समावेश

जप्त करण्यात आलेल्या वस्तुंचा खजिना दाखविणारी गॅलरी दोन भागांमध्ये विभागण्यात आली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे आर्थिक मूल्य असलेल्या भारतीय पुरातन वास्तू आणि कलावस्तुंचा समावेश आहे. या गॅलरीस भेट दिल्यानंतर प्रेक्षकांना तस्करांनी कशाप्रकारे कायद्यांचे उल्लंघन करून अवैधरित्या त्याची तस्करी केली याची माहिती मिळते. त्यातून तस्करांच्या धाडसीपणाबद्दल ते आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहात नाहीत.

देशविदेशांतील पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण

हे संग्रहालय स्थानिकांबरोबरच देशी विदेशी पर्यटकांनांही आकर्षित करणारे ठरणार आहे. त्याचबरोबर विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संदर्भ मार्गदर्शकही ठरणार आहे.  संग्रहालयातील वन्यजीव विभागात जप्त केलेल्या नैसर्गिक इतिहासाचा संग्रह पहावयास मिळणार आहे.

अफूच्या कायदेशीर शेतीविषयी मिळणार माहिती

अंमलीपदार्थ विभागात बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या अफू शेतीचे चित्रण पहावयास मिळणार आहे. त्यात खास करून अफू शेतीची प्रक्रिया, त्यासाठी वापरली जाणारी अवजारे आणि त्याची फार्मा कंपन्यांना विक्री करण्याची पद्धती यांची पूर्ण माहिती लेखी स्वरुपात पहावयास मिळणार आहे.

अनेक साधनसुविधांनी सुसज्ज संग्रहालय

महात्मा गांधीजींची दांडी यात्रा तसेच मीठ सत्याग्रह, तंबाखू उत्पादन शुल्क याबद्दलही माहिती करून घेता येणार आहे. संग्रहालयात व्हीलचेअरची देखील  सुविधा आहे. त्याशिवाय सशुल्क ऑडिओ मार्गदर्शक टूर, टच पॅनेल, कॅफेतारिया,  विविध माहितीपटांचे स्क्रीनिंग दाखविण्यासाठी ऑडिटोरियमही आहे. याच इमारतीत  एक चॅपेल असून प्रार्थनेसाठी ते सर्वांसाठी खुले असते.

अशा या अनोख्या संग्रहालयाचे दि. 11 रोजी उद्घाटन होणार असून प्रत्येकाने आवर्जून भेट देऊन तेथील वस्तु आणि साहित्य तसेच अनेख्या माहितीचा आपल्या ज्ञानवृद्धीसाठी वापर करावा, आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

जीसीएच्या आमसभेत क्रिकेट मैदानांच्या निर्मिती आणि अपग्रेडेशनवर भर

Patil_p

खैर झाडांची बेकायदेशीर कत्तलप्रकरणी पाचजणांना अटक

Amit Kulkarni

ट्रक मालक संघटनेच्या मागणीप्रमाणे वाहतूक करा, अन्यथा नको !

Patil_p

मडगावातील दुहेरी खून प्रकरण सत्र न्याया.त वर्ग करण्याचा आदेश

Patil_p

कर्लीजच्या कारवाईमुळे आजूबाजूच्यांचे धाबे दणाणले

Patil_p

10 हजार नोकऱया म्हणजे जनतेच्या डोळय़ात धूळफेक- काँग्रेसचा आरोप

Amit Kulkarni
error: Content is protected !!