डिजिटल व्यवसायाला मिळणार चालना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा ग्रुपने आपल्या सुपरअॅपमध्ये साधारण 16000 कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गुंतवणूक म्हणजे डिजिटल व्यवसायामध्ये अधिक गतीने विकास साधण्यासाठीचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे टाटा समूहाच्या सुपरअॅपला चांगली मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात ई-कॉमर्स कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज, फ्लिपकार्ट व अॅमेझॉन यांना स्पर्धा राहणार असल्याचे समजते.
टाटा समूहाला डिजिटल व्यवसाय वाढीसाठी पुढील दोन वर्षांमध्ये अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. पॅपिटल ऑनलाइन प्लॅटफॉर्म टाटा न्यू यासही या निधीचा फायदा होणार आहे. गेल्या वषी एप्रिलमध्ये टाटा न्यू सुरू झाले होते. या माध्यमातून डिजिटल ऑफर्स आणखीन चांगल्या पद्धतीने टाटाला सादर करता येणार आहेत. टाटा डिजिटलच्या सुपरअॅपच्या प्रसारासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. टाटा न्यू ची सुरूवात 2020 च्या मध्यावर झाली होती. पण मागच्या वर्षी यात तांत्रिक अडचणी जाणवल्या होत्या. यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अदानी ग्रुप हे देखील आपल्या सुपर अॅपचे लाँचिंग करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.