1 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कंपनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये जवळपास पास 5 लाख कार विकण्याची योजना बनवणार असल्याची माहिती टाटा मोर्ट्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या 77 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली आहे. यासोबतच आगामी वर्षापर्यंत कंपनी साधारणपणे 1 लाख इलेक्ट्रिक कार्सची विक्री करण्यावर भर देणार आहे.
यासोबतच कंपनीने 2021 मध्ये 5,000 इलेक्ट्रिक कार्स विकल्या, 2022 मध्ये 19,500 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. चालू वर्षात कंपनी 50 हजार कार्सची विक्री करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2025 पर्यंत कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये 10 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांमध्ये एकूण विक्रीत इलेक्ट्रिक कार्सची हिस्सेदारी ही 25 टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
दुसऱया सहामाहीत मजबूत कामगिरी शक्य
टाटा मोटर्सने आपले ध्येय निश्चित केले असून चालू आर्थिक वर्षातील दुसऱया सहामाहीत मजबूत कामगिरी करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पुरवठा साखळीत सुधारणा व किमतीमध्ये स्थिरता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार असल्याचेही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले.