Tarun Bharat

टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना 20 कोटीपेक्षा अधिकची वेतनवाढ

Advertisements

नवी दिल्ली

 आज सामान्यांच्या वेतनाबाबत फारसे काही कोणाला नसते. पण उद्योजक, श्रीमंतांच्याबाबतीत वेतनाबाबत उत्सुकता असते. यशस्वी उद्योजकांना तर दमदार वेतनवाढ होत असते. याचाच एक भाग म्हणजे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची वर्षाची वेतनवाढ 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. या बंपर वाढीसोबत चंद्रशेखरन यांचे वेतन 109 कोटी रुपये इतके झाले असल्याची माहिती आहे. याच्या विरुद्ध बाजूला कंपन्या आपल्या कर्मचाऱयांची वेतनवाढ ही 9 ते 11 टक्क्यांपर्यंत करतात.

आर्थिक वर्ष 2021 ते 22 च्या दरम्यान टाटा सन्स यांनी उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये कंपनीचा नफा हा 164 टक्क्यांनी वधारुन हा नफा 17,171 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या दरम्यान हा आकडा 6,512 कोटी रुपये होता. यासोबतच कंपनीचा नफा हा दुप्पट झाल्याची नोंद केली आहे.

19 टक्के झाली वेतनवाढ

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रशेखरन यांचे वेतन 19 टक्क्यांनी वाढून ते 109 कोटी रुपयावर पोहोचले आहे. या वाढीसोबत देशातील सर्वाधिक वेतन घेणाऱया प्रोफेशनलमधील ते एकजण राहिले आहेत.  एन चंद्रशेखरन यांना कंपनीने फेब्रुवारीत दुसऱयांदा कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

Related Stories

सिंगापूरच्या शॉपीने गुंडाळला गाशा

Patil_p

बँकांमधील 48 हजार कोटी रुपयांना दावेदार नाही

Patil_p

सलग चौथ्या दिवशीचे सत्र तेजीसह बंद

Patil_p

जॉय आल्लुकास ठरले ओमानचे पहिले प्रवासी गुंतवणूकदार

Patil_p

टोयोटा किर्लोस्करची इंडसइंडशी भागीदारी

Patil_p

एसबीआयच्या योनो शाखेचा तीन शहरात प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!