जमशेदपूर
जमशेदपूर येथील टाटा स्टील आपल्या एका युनिटसाठी स्वतंत्रपणे महिलांची पूर्णपणे नियुक्ती करणार असल्याची माहिती आहे. युनिटचे सर्व काम महिलांवर सोपवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.


कंपनीच्या कोक प्लांट आणि इलेक्ट्रिक रिपेरी शॉप फ्लोरवर उत्पादन, विक्री, विपणन आणि व्यवस्थापनाचे काम महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱयांच्या समूहाकडे सोपवले जाणार आहे. टाटा स्टीलच्या एका प्लांटमध्ये दिवस-रात्रपाळीसाठी कामाची जबाबदारी महिला सांभाळणार आहेत. टाटा स्टील अशा प्रकारे महिलांकडे पूर्णपणे जबाबदारी देणारी पहिली कॉर्पोरेट कंपनी मानली जात आहे.
कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी सांगितले की रात्रपाळीत काम करण्यासाठी महिलांना परवानगी मिळण्याबाबत कंपनीने झारखंड सरकारकडे मागणी केली आहे. परवानगी एकदा प्राप्त झाली की सदरच्या युनिटची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे सोपवली जाईल, असेही ते म्हणाले.