Tarun Bharat

‘टाटा’ची नवीन कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार बाजारात

30 मिनिटाच्या चार्जवर 500 किमी धावणार कार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टाटा मोर्ट्सने आपली आणखीन एक कॉन्सेप्ट कार जगासमोर आणली आहे. सदरची कार इलेक्ट्रिक वाहनाच्या प्लॅटफॉर्मवर आधारीत कार्यरत राहणार आहे. टाटा समूहाने चालू महिन्याच्या सुरुवातीला टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट कारचे सादरीकरण केले होते. सदरच्या नव्या कार ड्रायव्हरची आणि फ्रन्ट पॅसेंजरची सीट रिवॉल्विंग राहणार असून ती जवळपास 360 डिग्रीमध्ये फिरणारी आहे. 30 मिनिटांच्या चार्जिंगवर 500 किमीचे ही गाडी मायलेज देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

अविन्या म्हणजे इनोव्हेशन

या कॉन्सेप्ट कारचे नाव अविन्या (Avinya) ठेवण्यामागे टाटा मोर्ट्सचे एमडी शैलेष चंद्र यांनी म्हटले आहे, की हा संस्कृत भाषेतून शब्द घेतला आहे. तसेच याचा अर्थ आहे, इनोव्हेशन. यासोबतच याचे नाव इन असेही होते. जी भारताची ओळख असल्याचे स्पष्ट केले आहे.

टाटा अविन्याचे डिझाइन विशेष पद्धतीने ग्राहकांना पसंत पडेल असे तयार केले आहे. डिझाइन सिंपल आणि मिनिमलिस्टीक ठेवले आहे. कारच्या स्टेअरिंग व्हीलवर टच पॅनेल दिले आहे. याच्या आधारे कारवर संपूर्ण फिचर्स नियंत्रित करण्यात येतात.

विंडस्क्रीनसह टायर्स

अविन्याच्या विंड स्क्रीनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही स्क्रीन सनरुफसोबत मर्ज करुन ती कार्यरत होणार आहे. प्रंटग्रिलला बोल्ड लूक दिला आहे.

एआय कनेक्टेड राहणार पूर्ण कार

यावेळी टाटा मोर्ट्सने यामध्ये सॉफ्टवेअरची जोडणी अधिक केली आहे. यामध्ये पहिल्यांदा कारला एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स) मशीन लर्निंगवर आधारीत बदल करण्यात आला असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

360 डिग्रीमध्ये फिरणार खुर्ची

टाटा अविन्याने टीझर सादर केला असून यामधून या कारची ड्रायव्हर आणि पुढील सीट रिवॉल्विंग असणार असून ती तब्बल 360 डिग्रीमध्ये फिरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Related Stories

टीव्हीएसची नवी स्कूटर सादर

Patil_p

होंडाची ‘ऍक्टीव्हा 6 जी’ लवकरच बाजारात

prashant_c

‘होंडा’चे कारखाने लवकरच तात्पुरते बंद

Amit Kulkarni

अशोक लेलँडच्या विक्रीचा टप्पा 10,659 वर

Patil_p

नव्या वर्षात येणार टेस्लाची ‘कार’

Patil_p

अपाचेची नवी आरटीआर 160 मोटारसायकल

Patil_p
error: Content is protected !!