Tarun Bharat

तान्हुल्याच्या शरीरावर टॅटूच टॅटू

सोशल मीडियावर होतोय व्हायरल

शामेया मॉरिस नावाच्या महिलेने स्वतःच्या मुलाच्या शरीरावर वयाच्या 6 व्या महिन्यापासूनच टॅटू काढण्यास सुरुवात केली होती. आता मुलाच्या कोमल शरीरावर अनेक डिझाइनर टॅटू दिसून येतात. सोन्याची चेन आणि हँडबँड्ससह मुलाचा स्वॅग पाहून तो एखाद्या स्टारपेक्षा कमी वाटणार नाही. सोशल मीडियावर देखील मुलाचे अनेक फॉलोअर्स आहेत.

Advertisements

मुलाची स्टाइल पाहून काही लोकांना तो क्यूट वाटतो, तर त्याच्या मेकओव्हरवर आई शामेकिया मॉरिसची निंदा करणारे देखील कमी नाहीत. अशाप्रकारे छोटय़ा मुलाच्या शरीरावर टॅटूच टॅटू काढण्याचा प्रकार लोक योग्य मानत नाहीत आणि शामेकियाला एक वाईट आई म्हणण्यास ते मागे नाहीत.

ट्रेयलिन 6 महिन्यांचा असल्यापासून शामेकिया मॉरिसने त्याच्या शरीरावर टॅटू काढण्यास सुरुवात केली होती. पेशाने फॅशन डिझाइनर शामेकिया अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील रहिवासी असून तिला मुलाला अशाप्रकारे नटविणे अत्यंत आवडते.

ट्रेयलिनच्या हात, पाय आणि पोटावरही तिने टॅटू काढले आहेत. हे बॉडी आर्ट नकली असले तरीही शामेकियावर लोक टीका करत आहेत. लव्ह डोंट जज नावाच्या शोमध्ये शामेकियाने लोकांचे अशाप्रकारचे जजमेंट निराश आणि दुःखी करणारे असल्याचे म्हटले आहे. कुठल्याही 30 सेकंदांच्या टिकटॉक व्हिडिओद्वारे कुणाबद्दल मत तयार केले जाऊ नये असे तिचे म्हणणे आहे.

कुटुंबीयांना पूर्वी मुलाच्या शरीरावर टॅटू आवडत नसायचे. परंतु आता मुलगा बाहेर गेल्यावर त्याला मिळणारे अटेंशन त्यांना आवडू लागले आहे. ट्रेयलिनचे टिकटॉकवर 3 लाख फॉलोअर्स असून त्यांना मुलाचे टॅटू आणि त्याची स्टाइल पसंत आहे.

Related Stories

2022 पर्यंत राहणार सोशल डिस्टेंसिंग

Patil_p

अमेरिकेत कांद्यापासून पसरतोय सॅल्मोनेला बॅक्टेरिया; 400 लोक संक्रमित

datta jadhav

8 सेकंदांसाठी विलगीकरणाचा भंग, मोठा दंड

Omkar B

एका कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय CEO ने मागितली माफी; म्हणाले…

Abhijeet Shinde

विदेशींना यंदा हज यात्रा मुकणार!

Patil_p

भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

Patil_p
error: Content is protected !!