Tarun Bharat

Tauktae Cyclone : नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Advertisements

रत्नागिरी\ ऑनलाईन टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते वादळामुळे रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची नाना पटोले यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना केलं. रत्नागिरीतील नुकसानीची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नाना पटोले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, तौक्ते वादळामुळे कोकणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे. तसेच वस्तुस्थिती आणि तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, असे देखील ते यावेळी म्हणाले.

भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत केंद्राने मदत केलीच पाहिजे. हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असंही नाना पटोले म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ; 24 तासात 4814 नवे रुग्ण

Tousif Mujawar

गडकरीसह पालखीमार्गाच्या भूमिपूजनास पंतप्रधान मोदी पंढरपूरात…

Archana Banage

ठाकरे सरकारकडून 2016 मधील ‘या’ मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

Tousif Mujawar

राहुल गांधींकडून केंद्र सरकार लक्ष्य

Patil_p

सातारा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, 106 नवे कोरोना बाधित

Archana Banage

दारूच्या नशेत हसूर बुद्रुक येथील तरुणाची आत्महत्या

Archana Banage
error: Content is protected !!