आमदार जित आरोलकरांकडून शंकाचे निरसन करून शिष्टाई यशस्वी
प्रतिनिधी / मोरजी
मोप विमानतळावरील पर्यटन खात्याच्या टॅक्सी काऊंटरवर नावनोंदणी करण्यास मांदे मतदारसंघातील टॅक्सी व्यवसायिक तयार झाले. आमदार जित आरोलकर यांची शिष्टाई सफल झाली मात्र पर्यटन खात्याच्या पेडणे येथील नावनोंदणी कार्यक्रमाला पेडणे मतदारसंघातील टॅक्सी व्यवसायिक फिरकलेच नाहीत.
पर्यटन खात्यातर्फे मोपा विमानतळावर खास काउंटर उघडण्यात येणार आहे. त्यात टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी पेडणे तालुक्मयातीलच 450 टॅक्सी व्यवसायिकांना संधी मिळणार आहे. 31 डिसेंबरपर्यत वाहतूक खात्यात नावानोंदणी केलेले फक्त पेडणे तालुक्मयातील पर्यटक टॅक्सी असलेले बॅचधारक चालकच या ठिकाणी नावनोंदणी करू शकतात.
मांद्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद
पर्यटन खात्यातर्फे मोप विमानतळावर फक्त पेडणे तालुक्मयातील टॅक्सी व्यवसायिकांसाठी खास टॅक्सी काऊंटर उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी रविवारी मांदे येथील जिल्हा पंचायत सभागृह आणि पेडणे येथील सरकारी विश्रामगृहावर खास शिबिर आयोजित केले होते. आमदार जित आरोलकर यांच्या पुढाकाराने मांदे येथे आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर पेडणे येथील शिबिरात नावनोंदणी करण्यास टॅक्सी व्यवसायिक फिरकलेच नसल्याचे समोर आले आहे.
मांदे येथील शिबिराची जनजागृती आमदार जित आरोलकर यांनी केली होती शनिवारी सकाळी 10 वा. मांदे येथील श्री भगवती सप्तेश्वर मंदिराजवळ असलेल्या जिल्हा पंचायत सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. पर्यटन खात्याच्या या काऊंटर विषयी टॅक्सी व्यावसायिकांत शंका असल्याने याला विरोध करण्यासाठी सकाळपासून मांदे मतदारसंघातील टॅक्सी व्यवसायिक या ठिकाणी गोळा झाले होते. गोवा माईल्स प्रमाणे हा काउंटर सुद्धा टॅक्सी व्यवसायिकांच्या डोळय़ात धूळ फेकण्यासाठीच आहे. असा समज त्यांचा झाला होता. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास आमदार जित आरोलकर त्याठिकाणी आले. आधीच जमा झालेल्या टॅक्सी व्यवसायिकांनी त्याना गराडा घातला. या काऊंटरबाबत विरोध दर्शवित गोवा माईल्स ऍप प्रमाणे पेडण्यातील टॅक्सी व्यवसायिकांना फसवण्यासाठीच सर्व काही चालले असल्याचा आरोपही केला.
यावेळी आमदार आरोलकर यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. गोवा माईल्स आणि पर्यटन खात्याचा हा काउंटर या दोन्ही भिन्न गोष्टी असल्याचे सांगून मोप विमानतळावर पर्यटन खात्यातर्फे सुरू होणार टॅक्सी काऊंटर फक्त पेडणे तालुक्मयातील टॅक्सी व्यावसायिकासाठीच आहे. या ठिकाणी फक्त पेडणे तालुक्मयातीलच टॅक्सी व्यवसायिक आपली नावनोंदणी करू शकतात पर्यटन खात्याच्या दरा नुसारंच पर्यटका कडून भाडे आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे भाडे सर्वांनाच परवडण्या सारखे आहे. त्यात व्यवसायिकांना कमावण्याची संधी चालून आली आहे या काऊंटरवर पेडण्यातीलच 450 जणांस रोजगार मिळणार आहे. त्यामुळे आपण बिनधास्त नावानोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यातून टॅक्सी व्यवसायिकांचा फायदाच असल्याचे सांगून तसे न झाल्यास त्याची पूर्णपणे आपल्यावर जबाबदारी राहील. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी केवळ पेडणे तालुक्मयातील बेरोजगार युवकांचे हित लक्षात घेऊन हा काऊंंटर सरू केला असल्याचे सांगून नावनोंदणी करण्याचे उपस्थित टॅक्सी व्यावसायिकांना आवाहन केले. त्यानुसार टॅक्सी व्यावसायिक तयारही झाले. अनेकांनी याठिकाणी नावनोंदणी केली.
अपप्रचाराला बळी पडू नका!
तत्पूर्वी पर्यटन खात्यातर्फे आलेल्या गोवा इलेट्रॉनिक कंपनीच्या अधिकाऱयांनी टॅक्सी व्यवसायिक पर्यटन खात्याच्या ऍपवर ऑनलाईन पद्धतीने कशी नावानोंदणी करू शकतात याचे प्रात्यक्षिकही दाखवले. आमदार जित आरोलकर यांनी यावेळी आपल्या कार्यालयात टॅक्सी व्यवसायिक येऊन नावानोंदणी करू शकतात, असे सांगून तशी व्यवस्था आपण केली असल्याचे सांगून याविरोधातील अपप्रचाराला बळी पडून चांगली संधी गमावू नका, असे आवाहन केले.