Tarun Bharat

Solapur; अनय नावंदर यूपीएससी परीक्षेत 32 व्या रँकने यशस्वी

Advertisements

सोलापूर / प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापुरातील अनय नितीन नावंदर हा 32 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे शालेय शिक्षण सेंट जोसेफमध्ये तर अकरावी-बारावीचे शिक्षण आयएमएस कॉलेजमध्ये झाले. आयसिटीमध्ये केमिकल इंजिनिअर झाल्यानंतर त्याला नोकरी लागली होती. परंतु त्याने राष्ट्रसेवेत वाहून घेण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या परीक्षेची तयारी केली होती. त्यासाठी त्याने कोणताही क्लास व ट्य़ूशन लावली नव्हती. त्याने स्वतःचा आपल्या अभ्यासाची तयारी केली होती. त्याने सुरवातीपासूनच यूपीएससीची तयारी केली होती. आपल्या सुपुत्राने हे यश मिळवले आहे ते ही कोणतेही क्लासेस, टय़ूशन न लावता याचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे. अनयचे वडील नितीन नावंदर हे सीए आहेत तर आई अपर्णा नावंदर या न्यायाधीश आहेत. समाजात सगळीकडे खूप कौतुक होत आहे.

Related Stories

इम्रान सरकार पाडण्यासाठी 11 प्रमुख पक्ष एकवटले

datta jadhav

Kolhapur : युवा मल्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

Abhijeet Khandekar

शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम

Rahul Gadkar

यूपी, उत्तराखंडमधील राज्यसभेच्या 11 जागांसाठी 9 नोव्हेंबरला निवडणूक

datta jadhav

आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही; ट्विट करत बंडखोर आमदारांचे स्पष्टीकरण

Abhijeet Khandekar

प्रजासत्ताकदिनी मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार

datta jadhav
error: Content is protected !!