Tarun Bharat

पाच महिन्यांत चहाची निर्यात सात टक्क्यांनी वाढली

Advertisements

वाढीसोबत निर्यात पोहोचली 7.86 कोटी किलोग्रॅमवर 

वृत्तसंस्था /कोलकाता

चालू वर्ष 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत भारतातील चहाची निर्यात सुमारे सात टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीसोबत निर्यात 7.86 कोटी किलोग्रॅमवर पोहोचली आहे, अशी माहिती चहा बोर्डाने सादर केलेल्या आकडेवारीवरुन देण्यात आली आहे. जानेवारी ते मे 2021 या कालावधीत सुमारे 7.32 कोटी किलोग्रॅम इतकी राहिली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

संयुक्त अरब अमिरातीने (यूएइ) प्रथमच या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत 1.31 कोटी किलोग्रॅम चहाची खरेदी केली आहे. दरम्यान, रशियाने भारताकडून 1.15 कोटी किलो चहा विकत घेतला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात रशियाने 1.35 कोटी किलो चहा आयात केला होता.

उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी-मे, 2022 या कालावधीत सीआयएस ब्लॉकची एकूण आयातही किरकोळ घटून 1.64 कोटी किलो इतकी झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत 1.80 कोटी किलो होती. आणखी एक प्रमुख खरेदीदार असलेला इराण यांनी या कालावधीत 89.1 लाख किलोग्रॅम चहाची आयात केली, जी मागील याच कालावधीत 75.8 लाख किलोग्रॅम होती. अमेरिका आणि इतर अनेक देशांच्या निर्बंधानंतर पेमेंटच्या समस्यांमुळे इराणला होणारी निर्यात प्रभावित झाली.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्यात?

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षामुळे ही निर्यात शक्य झाल्याचे इंडियन टी असोसिएशनच्या (आयटीए) सूत्रांनी सांगितले. यामुळे सीआयएस देशांची आयात कमी झाली आहे आणि निर्यातदार यूएईला चहा निर्यात करण्याच्या संधी शोधत आहेत.

Related Stories

मायक्रोसॉफ्ट नोकरी देण्यात विश्वासू कंपनी

Patil_p

नवीन सात कंपन्या 15 ऑक्टोबरपर्यंत होणार सुरू

Patil_p

कोरोना काळात स्मार्टफोन कंपन्यांचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

जग्वार लँड रोव्हरच्या वाहन विक्रीत वाढ

Patil_p

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Patil_p

सॅमसंग व्हिएतनामधील व्यवसाय भारतात आणणार

Patil_p
error: Content is protected !!