Tarun Bharat

शाब्बास ! कुरुंदवाडच्या चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती

Advertisements

रवींद्र केसरकर, कुरुंदवाड प्रतिनिधी

कुरुंदवाड (कोल्हापूर) : मनात जिद्द असली की अवकाशात भरारी मारता येते. मग कितीही अडथळे येऊ देत यशापर्यंत पोहचाचं असा ठाम निश्चय करून कुरुंदवाड येथील तेरवाड गावची कन्या निकिता सुनील कमलाकर हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं.घरची परिस्थिती बेताची. वडिल एका पायाने अपंग आहेत. कुटुंबाचं पोषण करण्यासाठी त्यांनी गावातच चहाचा गाडा टाकलायं. आपल्या मुलीने खेळात प्राविण्य मिळवावं अस ठरवून त्य़ांनी निकिताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत उतरवलं. तिला तिच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याच जोरावर तिने उझबेकीस्थान ताश्कंद येथे आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं. निकिताचे देशभरासह सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

उझबेकीस्थान ताश्कंद येथे आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावल्यानंतर निकिता कमलाकर



उझबेकिस्तान येथील तारकंद येथे आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये ५५किलो वजनी गटात निक्कीताने ६८ किलो स्नॅक आणि ९५ किलो क्लिन ॲण्ड जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केले तर क्लीन ॲण्ड जर्कमध्ये सुवर्ण पदक पटकाविले. एक महिन्यापूर्वी मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यावेळी पदक हुकले होते. तिला विश्वविजय जीमचे प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकिताच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून कौतुक होत आहे.

स्पर्धेसाठी कशाचीही कमतरता पडू देणार नाही
निकिता आशियाई स्पर्धेत पदक मिळविल्याने आमच्या कष्टाचे चिज झाले. तिच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कशाचीही कमतरता पडू देणार नाही.त्यासाठी आम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची आमची तयारी आसलेचे निकिताचे वडिल- सुनिल कमलाकर, आजोबा- रावसाहेब कमलाकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Stories

“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; मनिष तिवारींचा सिद्धूवर घणाघात

Abhijeet Shinde

त्यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, गावात फटाक्याची आतषबाजी

Abhijeet Shinde

‘सीपीआर’मध्ये सॅनिटनाझर चेंबर, स्वॅब केबी

Abhijeet Shinde

देशद्रोही जैन यांचे किती काळ संरक्षण करणार ? : स्मृती इराणी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : सायंकाळी सहा पर्यंत २७ रिपोर्ट पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

युवा टेनिसपटूंच्या आर्थिक मदतीसाठी त्रिमूर्तीचा पुढाकार

Omkar B
error: Content is protected !!