Tarun Bharat

अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

कोल्हापूर सर्कलकडे जाताना टँकरची दुचाकीला धडक

प्रतिनिधी/ बेळगाव

टँकरची दुचाकीला धडक बसून टँकरखाली सापडल्याने एका शिक्षकेचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी वायजक्शंन (हॉटेल युके-27) जवळ हा अपघात घडला असून वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

रेणूका महेश भातकांडे (वय 33, रा. शिवाजीनगर) असे त्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. तिच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कोरोनामुळे रेणूका यांच्या पतीचाही मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर त्या माहेरी टेंगिनकेरा गल्ली येथे राहत होत्या. एक-दोन महिन्यांपासून त्या कामावर जात होत्या.

घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेणूका यांना तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. रात्री उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला. शिक्षिकेच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अंत्यविधी रविवारी सकाळी 10 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.

Related Stories

यमकनमर्डी मतदारसंघातील ग्राम पंचायतीसाठी शेकडो अर्ज दाखल

Patil_p

समितीचे नेते वाय. बी. चौगुले यांना नवहिंदतर्फे श्रद्धांजली

Patil_p

गवळी गल्लीला हॉटस्पॉट घोषित केल्याने गवळी बांधवांवर अन्याय

Patil_p

‘पास’विना रेल्वेचा प्रवास झाला खडतर

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्ये श्री होम्स अपार्टमेंटमधील रहिवाशांनी राबविले विविध उपक्रम

Patil_p

संक्रांतीनिमित्त मंगाईदेवीची विशेष आरास

Patil_p