प्रतिनिधी / बेळगाव
वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली. दरम्यान आज बुधवार दि. 15 रोजी ज्योती कॉलेज येथे मतमोजणीला प्रारंभ झाला असून या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी 12 तर पदवीधर मतदारसंघासाठी 11 जण रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, निजद यासह अपक्षांनीही ही निवडणूक लढविली आहे. काही अपक्षांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे विजयी कोण होणार? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.
गुरुवारी सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधण्यात आले.
कोरोनाचे सर्व नियम पाळत ही मतमोजणी सुरू आहे. पार्किंगची सोय सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार तसेच एजंट व समर्थकांना त्या ठिकाणीच सर्व वाहने पार्किंग करावी लागणार आहेत.
ओळखपत्र नसलेल्या एजंटला जिल्हाधिकाऱयांनी माघारी धाडले
विधान परिषदेच्या मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांच्या एजंटना ओळखपत्र देण्यात आले होते. मात्र एक एजंट विना ओळखपत्र आत अला होता. त्याला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी तो विनवणी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जिल्हाधिकाऱयांनी विना ओळखपत्र तू आत का आलास म्हणून स्वतः हात धरूनच त्याला बाहेर काढले. यावेळी जिल्हाधिकाऱयांचा पारा चांगलाच चढला होता.