Tarun Bharat

शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया

आदर्श शिक्षक किरण करंबळकर यांचा काकती गामस्थांतर्फे सत्कार

वार्ताहर /काकती

शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. शिक्षक हा समाज घडविणारा असून, समर्पित वृत्तीने काम करणाऱया किरण करंबळकर सारख्या शिक्षकांमुळे समाज व राष्ट्राचा विकास होतो, असे प्रतिपादन शिक्षणप्रेमी स्टेट बँकच निवृत्त पर्यवेक्षक भरमा नागाप्पा गवी यांनी केले.

येथील सरकारी आदर्श मराठी शाळेच्या नूतन सभागृहात शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला असून काकती गावच्यावतीने शनिवार दि. 17 रोजी सत्कार समारंभ मोठय़ा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी एस. डी. एम. सी. कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ रुटकुटे होते. व्यासपीठावर ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सिदाप्पा गाडेकर (टुमरी) बेळगाव ता. प्रा. शिक्षक सोसायटी चेअरमन अन्वर लंगोटी, माजी चेअरमन ता. प्रा. शि. सोसायटी शेखर करंबळकर, हिंडाल्को इंडस्ट्रीजचे संपर्क अधिकारी रवी बिसगुप्पी, टायर सोल्सचे मॅनेजर एस. जी. पाटील, कर्नाटक राज्य प्रा. शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश दयेण्णावर, मराठा मंडळ हायस्कूल उपप्राचार्या लता शिंदे, डॉ. एम. एस. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात स्वागतगीत नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक पीई शिक्षक अशोक अरवळ्ळी यांनी केले. कार्यक्रमात पुढे भरमा गवी म्हणाले, उत्तम विद्यार्थी घडविण्याचे कार्य किरण करंबळकर व सह शिक्षिका करीत आहेत. मुलांचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती. अजरामर आठवणीत राहणार आहे. यासह यल्लाप्पा कोळेकर, बाबुराव पिंगट, गोविंद देसाई, शेखर करंबळकर, सुभाष मुंगारी आदीनी करंबळकर गुरुजींच्यामुळे आता काकती गावची ओळख आदर्श शिक्षकाचे म्हणून होईल. शाळेत डिजीटल तंत्रज्ञान वापरुन उल्लेखनीय कार्य केले याचा फायदा भविष्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. पारंपरिक विचारापेक्षा वेगळा विचार करुन शाळेचा कायापालट करुन नाविन्यपूर्णता आणले आहे, असे आदांनी विचार मांडून शुभेच्छा दिल्या.

सत्कारमूर्ती किरण करंबळकर त्यांच्या धर्मपत्नी शिक्षिका अलका करंबळकर यांचा सत्कार प्रथम मराठी शाळा एसडीएमसी यांचेकडून शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन करण्यात आला. त्यानंतर काकती ग्राम पंचायत, सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळ, सिद्धेश्वर सोसायटी, श्रीमाता सोसायटी, बेळगाव ता. शिक्षक सोसायटी, माजी विद्यार्थी संघटना काकती, काकती दूध उत्पादक संघ, सार्वजनिक गणपती दूध उत्पादक संघ, गावातील सर्व सरकारी व कॉन्व्हेट शाळा याशिवाय भिमा बसरीकट्टी मेश्री, गणपत सुरेकर, सचीन मुंगारी, यश इंडस्ट्रीजचे मनोहर सोनुलकर, सिदराई सोनुलकर, माजी ग्रा. पं. सदस्य शिवाजी लोहार, मधु कोले, सुशांत परमोजी  आदींसह परिसरातील 50 हून अधिक शिक्षण प्रेमीनी शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून सत्कार केला. शिक्षिका के. एल. जगताप यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Related Stories

उचगाव ग्रा.पं.मध्ये वनमहोत्सव

Patil_p

शिक्षणसंस्थांमधील संशोधन ही काळाची गरज !

Patil_p

कोल्हापूर सर्कल जवळ स्मोकशॉपवर छापा

Tousif Mujawar

स्मार्ट बसथांब्यांवरील गाळे देणार भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni

विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्थेच्या अमृतमहोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

हिंडलगा लक्ष्मीनगर येथे अतिक्रमण करून खोदली कूपनलिका

Amit Kulkarni