Tarun Bharat

गुजरातमध्ये ‘टीम मोदी सपोर्ट संघ’ कार्यरत

मागील 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला अद्याप काही मतदारसंघांमध्ये विजय मिळविता आलेला नाही. साबरकांठा जिल्हय़ातील खेडाब्रह्म या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजप 1995 पासून प्रयत्न करत आहेत. पक्षाला आतापर्यंत अशा अनेक मतदारसंघांमध्ये विजय मिळविता आलेला नाही. अशा स्थितीत आम आदमी पक्षाच्या एंट्रीमुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपाला संधी दिसून येत आहे.

भाजपसाठी आव्हानात्मक असलेल्या मतदारसंघांमधील स्थिती बदलण्यासाठी टीम मोदी सपोर्ट संघ हा समुह प्रयत्नशील दिसून आला आहे. या संघटनेची सुरुवात 2015 मध्ये उत्तरप्रदेशातून झाली होती. निवडणुकांमध्ये भाजपला समर्थन मिळवून देणे या समुहाचा उद्देश आहे. खेडब्रह्ममध्ये प्रारंभापासूनच काँग्रेसची मजबूत पकड राहिली आहे. अशा स्थितीत आम्ही आमच्या संघटनेच्या आदिवासी युवकाला अध्यक्ष केले, त्याने आदिवासी लोकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता आमच्याकडे 100 हून अधिक आदिवासी युवक पक्षासाठी काम करत असल्याचे टीम मोदी सपोर्ट संघाचे महासचिव अतुल माकडिया यांनी सांगितले आहे.

सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांबद्दल नाराजी असलेल्या ठिकाणी टीम मोदी सपोर्ट संघाच्या सदस्यांनी जात लोकांची वैयक्तिक स्तरावर समजूत काढली आहे. पक्षाने स्थानिक उमेदवार न दिल्याने काही ठिकाणी विरोध होत होता. अशा ठिकाणी जात आम्ही उमेदवार नव्हे तर पक्ष महत्त्वाचा, त्याची विचारसरणी जाणून घ्या असे सांगत होतो अशी माहिती टीम मोदी सपोर्ट संघाचे गुजरात अध्यक्ष प्रवीणभाई नकहुम यांनी दिली आहे.

मोठी संघटन शक्ती

भाजपचे समर्थक नसलेल्या मतदारांना भाजपबद्दल आकर्षित करण्याचे काम हा समूह करतो. या समुहाकडे सुमारे 40 हजार सदस्य आहेत. प्रत्येक तालुका, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघासाठी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे 78 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा समूह सक्रीय होता. प्रत्येक मतदारसंघातील सुमारे 5 हजार ते 10 हजार मतदारांवर प्रभाव पाडू शकतो असा दावा या समुहाचे उपाध्यक्ष हीरेन मेहता यांनी केला आहे. ही टीम भाजप उमेदवारसोबत सक्रीयपणे काम करत होती.

Related Stories

एक कोटी लाचप्रकरणी रेल्वे अधिकाऱयाला अटक

Patil_p

चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणाऱया युवतीचे घुमजाव

Omkar B

तेजबहादुरची याचिका फेटाळली

Patil_p

पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा

Patil_p

विमानवाहू ‘विक्रांत’च्या समुद्री चाचण्या सुरू

Patil_p

गुजरात : भीषण आगीत 25 वाहने जळून खाक

datta jadhav