वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणारा पॅरा नेमबाज मनीष नरवालने फ्रान्समधील चेतरॉ येथे सुरू असलेल्या विश्व पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पध्sा&तील पी 4 मिश्र सांघिक 50 मी. पिस्तुल एसएच 1 प्रकारात रौप्यपदक मिळविले.
10 मी. म़िश्र सांघिक गटात सुवर्ण मिळविलेल्या 20 वर्षीय मनीषने सिंघराज अधाना व आकाश यांच्यासमवेत खेळताना एकूण 1581 गुण नोंदवत दुसरे स्थान घेतले. चीनच्या संघाने या प्रकारात सुवर्ण मिळविताना 1628 गुण घेतले तर तुर्कीने 1565 गुण घेत कांस्यपदक मिळविले.
वैयक्तिक विभागात मात्र भारतीय नेमबाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. फक्त आकाश पी 4 मिश्र 50 मी. पिस्तुल एसएच 1 अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मात्र अंतिम फेरीत तो पाचव्या स्थानावर राहिला. त्याने 159.4 गुण घेतले. चीनच्या यांग चाओने 223.9 गुण घेत सुवर्ण, त्याचाच देशवासी हुआंग झिंगने 218.5 गुण घेत रौप्य व उझ्बेकच्या इब्रागिमोव्ह सरवरने (200.7) कांस्यपदक मिळविले. सिंघराज व नरवाल यांनी पात्रता फेरीत नववे व दहावे स्थान मिळविले होते.