टोयोटाच्या नव्या इनोव्हा हायक्रॉसचा टीझर प्रदर्शित
नवी दिल्ली
टोयोटा इंडियाची लवकरच नवी कार इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही सादर होणार असल्याची माहिती आहे. यासंबंधीचा टीझर नुकताच कंपनीने प्रदर्शित केला होता, त्यामुळे या नव्या गाडीबाबत आता ग्राहकांची उत्सुकता अधिक वाढताना दिसते आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडियाने मल्टी पर्पज व्हेईकल अर्थात बहुपर्यायी वाहन(एमपीव्ही) इनोव्हा हायक्रॉस बाजारात उतरवण्याचे निश्चित केले आहे. समोरच्या दर्शनी भागाचे दर्शन कंपनीने सादर केलेल्या टीझरमध्ये अनेकांना नुकतेच पाहता आले आहे. या गाडीत फ्रंट ग्रिल आकर्षक असून एल शेपड् हेडलॅम्पसही आहेत. ही गाडी प्रंट व्हील ड्राइव्ह मोनोकोक चेसिससह येण्याची शक्यता असून हायब्रिड टेक्नॉलॉजीचे इंजिन यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. किंमत व इतर गोष्टींचा सविस्तर खुलासा मात्र केलेला नाही.