मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये सादरीकरण
नवी दिल्ली : मोबाईल वर्ल्ड काँग्रेस(एमडब्लूसी) 2023 या कार्यक्रमात टेक कंपनी टेक्नो यांनी आपला पहिलाच फोल्डेबल 5 जी स्मार्टफोन फेन्टम व्ही फोल्डचे सादरीकरण करण्यात आले आहे. भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी स्टाईलिश व प्रगत डिझाईन असलेल्या या स्मार्टफोनची किमतही कंपनीने जाहिर केली आहे. हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये भारतात दाखल करण्यात आला आहे. सादरीकरणानंतर कंपनीने 12जीबीसह 265 जीबी मॉडेलची किमत 89,999 रुपये तर 12 जीबीसह 512जीबी मॉडेलची किमत अंदाजे 99,999 रुपये इतकी राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
फिचर्स
- डिस्प्ले : एलटीपीओ अमोलेड पॅनेल 7.65 इंच मुख्य स्क्रीन
- कॅमेरा : अल्ट्रा क्लिअर5 लेन्स फोटोग्राफी
- मीडिया टेक डिमिस्ट्री ऑक्टो कोर प्रोसेसर
- चार्जिंग सुविधा : 45डब्लू फास्ट चार्जिंग सुविधा
- स्पार्क 10 प्रोसह मेगाबुक एस1
लॅपटॉपही सादर
- टेक्नो स्पार्क 10 प्रो व मेगाबुक एस 1 लॅपटॉप सादर
- टेक्नो स्पार्क 10 प्रो हा 32 एमपी फ्रंट कॅमेरा असलेला सेल्फी केंद्रीत फोन